Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » फेसबुकवरील जाहिरातीवर विश्वास ठेवला अन् २१ लाख गमावले!
    क्राईम

    फेसबुकवरील जाहिरातीवर विश्वास ठेवला अन् २१ लाख गमावले!

    editor deskBy editor deskOctober 20, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    धान्य खरेदीसाठी त्याची रक्कम दिल्यानंतर मका न पाठविता पी. व्ही. सुरेश (रा. चेन्नई) या व्यापाऱ्याची २१ लाख ९४ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. ही घटना दि. २८ सप्टेंबर ते दि. १५ ऑक्टोबर दरम्यान घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चेन्नई येथील धान्य व्यापारी पी. व्ही. सुरेश यांना फेसबुकवर एक पोस्ट दिसली. त्यामध्ये असलेल्या मोबाईल क्रमांकावर श्यामलाल नामक व्यक्तीशी त्यांनी संपर्क साधला असता त्याने अमळनेर येथे मका असल्याचे सांगितले. त्यामुळे व्यापारी अमळनेर येथे आले होते. अमळनेर येथील गोदामाजवळ विशाल शुक्ला व अविनाश पाटील हे दोन जण भेटले. त्यांनी सुरेश यांना मका दाखविला व तो घेण्याची व्यापाऱ्याने तयारी दर्शविली. त्यासाठी श्यामलाल यांना २१ लाख ९४ हजार ४४० रुपये पाठविले होते. व्यापाऱ्याने श्यामलाल यांना पैसे पाठविले, मात्र अमळनेर येथे असलेल्या दोन जणांनी ही रक्कम आम्हाला मिळाली नसल्याचे सांगत मका देण्यास नकार दिला.

    त्यामुळे व्यापाऱ्याने श्यामलाल यांच्याशी संपर्क साधला असता तो उडवाउडवीचे उत्तर देत होता. या प्रकरणी पी. व्ही. सुरेश यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून श्यामलाल, विशाल शुक्ला (रा. नागपूर), अविनाश पाटील या तिघांसह बँक खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव-बांभोरी पुलावर भीषण अपघात; तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर, अखेर गुन्हा दाखल !

    October 20, 2026

    काळवीट प्रकरणात वनरक्षक निलंबित!

    October 20, 2026

    जळगावात टी.बी. हॉस्पिटलमधील कचरा संकलनाच्या कामाला गती; आयटीआयजवळील रॅम्प तातडीने बंद करण्याचे उपमहापौरांचे निर्देश!

    October 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.