Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » देवीच्या दर्शनाहून परतताना दुर्दैवी अंत; कुटुंबाचा आधार हरपल्याने हळहळ
    क्राईम

    देवीच्या दर्शनाहून परतताना दुर्दैवी अंत; कुटुंबाचा आधार हरपल्याने हळहळ

    editor deskBy editor deskOctober 14, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील भोरस खुर्द येथील नवदुर्गा मित्र मंडळाचे सदस्य सप्तशृंगी गडावरून देवीची पायी ज्योत घेऊन परतत असताना झालेल्या भीषण अपघातात आनंद परमेश्वर पाटील (वय ३९) या भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. १० ऑक्टोबरला दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास महामार्गावरील सौंदाणे फाट्याजवळ हा अपघात घडला.

    या अपघातात काळ्या रंगाच्या वाहनाने जबर धडक दिल्याने आनंद पाटील यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, भोरस खुर्द येथील नवदुर्गा मित्र मंडळाचे १५ ते २० सदस्य ९ ऑक्टोबरला सप्तशृंगी गडावर देवीची ज्योत आणण्यासाठी गेले होते. देवीची ज्योत घेऊन पायी परत येत असताना मुंबई महामार्गावरील सौंदाणे फाट्याजवळ काळ्या रंगाच्या वाहनाने जबर धडक दिल्याने आनंद पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. आनंद पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुं‌बावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचा आधार असलेला कर्ता पुरुष काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. मयत आनंद पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भोरस खुर्दसह संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यात खळबळ : मंदिरात मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न: सीसीटीव्हीत कृत्य कैद !

    October 14, 2026

    शाळा सुटल्यानंतरचा प्रवास ठरला अखेरचा : १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

    October 14, 2026

    शेतीची नापिकी अन् गृहकर्जाचा भार; किनोदच्या शेतकऱ्याच्या मृत्यूने हळहळ

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.