Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शाळा सुटल्यानंतरचा प्रवास ठरला अखेरचा : १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
    क्राईम

    शाळा सुटल्यानंतरचा प्रवास ठरला अखेरचा : १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

    editor deskBy editor deskOctober 14, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शाळा सुटल्यानंतर खासगी वाहनाने कंडारी येथे घरी परतत असताना ते वाहन उलटून जखमी झालेल्यांमधील अर्जुन उर्फ प्रदीप प्रल्हाद कोळी (वय १६, रा. कंडारी, ता. जळगाव) या विद्यार्थ्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि.१३ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील उमाळा येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर कंडारी येथे खासगी वाहनाने घरी जात होते. त्या वेळी वाहन उलटून ९ विद्यार्थी जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. या जखमींमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकरणा विद्यार्थी अर्जुन कोळी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला गोदावरी महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरु असतांना मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यात खळबळ : मंदिरात मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न: सीसीटीव्हीत कृत्य कैद !

    October 14, 2026

    देवीच्या दर्शनाहून परतताना दुर्दैवी अंत; कुटुंबाचा आधार हरपल्याने हळहळ

    October 14, 2026

    शेतीची नापिकी अन् गृहकर्जाचा भार; किनोदच्या शेतकऱ्याच्या मृत्यूने हळहळ

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.