Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महाराष्ट्र ग्रामीण बँकेबाहेर चोरट्यांचा डाव : दुचाकीच्या डिक्कीतून २.१५ लाखांची पिशवी लंपास !
    क्राईम

    महाराष्ट्र ग्रामीण बँकेबाहेर चोरट्यांचा डाव : दुचाकीच्या डिक्कीतून २.१५ लाखांची पिशवी लंपास !

    editor deskBy editor deskOctober 10, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा  : प्रतिनिधी 

    शहरातील भडगाव रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून २ लाख रुपयांची आपली कष्टाची कमाई शेती कामासाठी वृद्ध शेतकऱ्याने काढली. मात्र, वृद्ध शेतकऱ्याची दिशाभूल करत चोरट्यांनी २ लाख १५ हजार रुपये चोरुन नेल्याची घटना ९ ऑक्टोबरला भरदुपारी घडली. क्षणार्धात दोन्ही चोरटे दुचाकीवरुन पसार झालेत.

    मिळालेल्या माहितीनुसार,  एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील प्रकाश जिवराम पाटील यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून शेतीसाठी लागणारे बियाणे खरेदी, शेती कामाची मजुरी वाटप व इतर खर्चासाठी ९ ऑक्टोबरला दुपारी १ वाजेच्या सुमारास २ लाखांची रोकड काढली. ही रोकड व त्यांच्याजवळ आधीच १५ हजार रुपये होते. असे २ लाख १५ हजार रुपये प्रकाश पाटील यांनी पिशवीत ठेवले. रोकड घेऊन ते त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवत असतानाच त्यांच्या मागून आलेल्या अज्ञात दोघा व्यक्तींनी दुचाकी (मोपेड) मधील डिक्कीतील २ लाख १५ हजारांची पिशवी घेऊन घटनास्थळावरुन सिनेस्टाईल पोबारा केला. प्रकाश पाटील यांनी मागे वळून पाहिले असता क्षणार्धात चोरटे पसार झाले होते.

    घटनेची माहिती मिळताच पो.नि. राहुलकुमार पवार, पो.उ.नि. कृष्णा घायाळ, जितेंद्र पाटील, पो.हे.कॉ. राहुल शिंपी, पो. कॉ. योगेश पाटील यांनी घटनास्थळी दाखल झाले. महाराष्ट्र ग्रामीण बँके परिसरातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पो.नि. राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनात पो.कॉ. गजानन देशमुख करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    घरातून बेपत्ता, विहिरीत मृतावस्थेत आढळले : नशिराबादच्या घटनेने खळबळ !

    October 10, 2026

    जळगावात हृदयद्रावक घटना : वीजेच्या धक्क्याने १४ वर्षीय वारकरी विद्यार्थ्याचा मृत्यू

    October 10, 2026

    अवैध वाळू साठ्याचा ठपका; मंडळ अधिकारी निलंबित, जळगाव महसूल विभागात खळबळ

    October 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.