Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष अन् ७ लाखांचा गंडा : संशयिताला पोलीस कोठडी !
    क्राईम

    शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष अन् ७ लाखांचा गंडा : संशयिताला पोलीस कोठडी !

    editor deskBy editor deskOctober 7, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून नफा देण्याचे अमिष दाखवत अॅड, तोषिता ज्ञानेश्वर भिरूड (वय ५३, रा. रामदास कॉलनी) यांची ७ लाख रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी संशयित अतुल भास्कर पाटील (रा. बांभोरी, ता. धरणगाव) याला अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामदास कॉलनी राहणाऱ्या अॅड. तोषिता भिरूड यांच्या परिचयातील प्रीती पाटील यांनी त्यांचा मुलगा अतुल पाटील व सून जयश्री पाटील हे शेअर मार्केटमधून अनेकांना फायदा करून देत असल्याचे सांगितले. तसेच अतुल व जयश्री या दोघांनीही माहिती दिली. त्यानुसार तोषिता भिरूड यांनी दि. ३० एप्रिल रोजी अतुल पाटील यांच्या खात्यावर गुंतवणुकीसाठी १ लाख ५० हजार रुपये पाठविले. त्यावर त्यांना काही दिवस परतावा दिला. त्यामुळे विश्वास निर्माण झाल्याने पुन्हा २ लाख, नंतर वेळोवेळी वेगवेगळी रक्कम दिली. मात्र त्यांना परतावा दिला नाही. तसेच दिलेले धनादेशही बाऊन्स झाले. पैशाचा तगादा लावल्याने त्यांना धमकी देण्यात आली. या प्रकरणी तोषिता भिरूड यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अतुल पाटील, जयश्री पाटील, सुरेखा पाटील या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    गुन्हा दाखल झाल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वारुंगसे यांनी संशयित अतुल पाटील याला मंगळवार दि. ६ ऑगस्ट रोजी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्या. निकम यांनी त्याला दि. १० ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धानवड-पिंपळे चिंचोली शिवारातील धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी !

    October 7, 2026

    पिक विम्याच्या लाभाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी; कृषी विभागाकडे चौकशीची मागणी

    October 7, 2026

    गुटखा तस्करीवर मुक्ताईनगर पोलिसांचा घाला; १९ लाखांचा माल जप्त, एकाला अटक

    October 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.