Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जन्मदात्यांनीच घेतला मुलाचा जीव : दारूच्या व्यसनावरून मारहाण, उपचारांअभावी मृत्यू !
    क्राईम

    जन्मदात्यांनीच घेतला मुलाचा जीव : दारूच्या व्यसनावरून मारहाण, उपचारांअभावी मृत्यू !

    editor deskBy editor deskOctober 5, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहिल्यानगर‎ : वृत्तसंस्था

    जिल्ह्यातील तालुक्यातील गुणवडी शिवारात‎ दारूच्या व्यसनावरून झालेल्या ‎वादातून आई-वडिलांनी आपल्या ‎मुलाला लाकडी दांडक्याने बेदम ‎मारहाण केली. यात गंभीर जखमी‎ होऊन उपचारांविना त्याचा मृत्यू‎ झाला. त्यानंतर पुरावा नष्ट ‎करण्यासाठी आई-वडिलांनी ‎मृतदेह शेतात नेऊन जाळल्याची ‎घटना उघडकीस आली आहे.‎ प्रवीण प्रकाश लांडगे (वय ‎अंदाजे 25) असे मृत तरुणाचे ‎नाव आहे. या प्रकरणी त्याचे‎ वडील प्रकाश लांडगे आणि आई ‎आशा लांडगे (रा. गुणवडी)‎ यांना ताब्यात घेतले आहे, असे ‎एपीआय गणेश वारुळे यांनी‎ सांगितले.‎

    प्रवीणला दारूचे व्यसन जडले ‎होते. तो आई-वडिलांसोबतच ‎राहत असल्याने दारूच्या ‎कारणावरून त्यांच्यात वाद होत‎ असत. काही दिवसांपूर्वी प्रवीण‎ दारू पिऊन घरी आल्यानंतर‎ झालेल्या वादातून वडिलांनी‎ त्याला लाकडी दांडक्याने‎ मारहाण केली. यामध्ये तो गंभीर ‎जखमी झाला. मात्र, त्याला ‎रुग्णालयात उपचारासाठी ‎नेण्याऐवजी आई-वडिलांनी‎ त्याला घरातच ठेवले. अखेर दोन ‎दिवसांनी उपचारांविना त्याचा‎ मृत्यू झाला.‎

    जखमी अवस्थेत असलेल्या‎ मुलाचा दोन दिवसांनी ‎मृत्यू झाल्याचे ‎आई-वडिलांच्या लक्षात ‎आले. मुलगा मृत ‎पावल्यानंतर आई-वडिलांनी हा‎ प्रकार कोणालाही न सांगता ‎रविवारी (ता. 4) पहाटेच्या‎ सुमारास मृतदेह घरापासून 4‎ कि.मी. अंतरावरील स्वतःच्या‎ शेतात नेऊन तिथे जाळून ‎टाकला. दरम्यान, शेतात मानवी‎ शरीर जळाल्याची कुणकुण‎ लागताच तालुका पोलिसांनी ‎घटनास्थळी धाव घेतली. तिथे ‎जळालेले अवशेष व हाडे ‎आढळून आली. पोलिसांनी कसून‎ चौकशी केल्यानंतर हा प्रकार‎ उघडकीस आला. आई-वडिलांनी ‎खुनाची कबुली दिली असल्याचे ‎एपीआय गणेश वारुळे यांनी ‎सांगितले आहे.‎

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मोबाईल बंद करून लपला, पण पोलिसांच्या तांत्रिक तपासातून सापडला; पाच महिन्यांनी अल्पवयीन मुलीचा शोध

    October 5, 2026

    सागवान तस्करीचा बेत फसला; वन विभागाच्या पथकाला पाहताच तस्कर दुचाकी सोडून पसार!

    October 5, 2026

    इन्स्टाग्रामवर भेटला, लग्नाचे वचन दिले; जळगावसह नाशिकमध्ये अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप !

    October 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.