Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
    जळगाव

    अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

    editor deskBy editor deskOctober 5, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाआतील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२६ स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन रविवारी (दि. ४) अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडांगणावर झाले. देशभरातील १५ संघांचे २७० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून, दि. ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान साखळी व बाद पद्धतीने सामने खेळविले जाणार आहेत.

    उद्घाटनप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य तथा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबाशीस दास, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे यांच्यासह ज्योती जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन आदी उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला अशोक जैन यांच्या हस्ते अनुभूती निवासी स्कूलचा ध्वज फडकाविण्यात आला. विद्यार्थिनींनी ‘अब मुश्किल नहीं…’ हे स्वागतगीत सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एरोबिक्सच्या सामूहिक नृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. स्पर्धेतील सर्व संघांनी मार्चपास्ट करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

    अशोक जैन व अतुल जैन यांच्या हस्ते कृति ओसवाल हिच्याकडे क्रीडा मशाल सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर मशाल रन झाली. राष्ट्रीय क्रिकेटपटू अन्मय जैन, रणवीर राणा, कृति ओसवाल यांच्यासह खेळाडूंनी क्रीडाज्योत प्रज्वलित केली. प्राचार्य देबाशीस दास यांनी सहभागी खेळाडूंना क्रीडा शपथ दिली.

    यावेळी अतुल जैन यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना सांगितले की, “सांघिक भावनेने क्रिकेटचा आनंद घ्या. खेळातील विजय-पराभव महत्त्वाचा असला तरी या स्पर्धेतून मिळणाऱ्या चांगल्या आठवणी आयुष्यभर स्मरणात राहतील.”

    १५ संघांतील २७० खेळाडूंचा सहभाग
    सीआयएससीई बोर्डच्या १७ वर्षाआतील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत आंध्रप्रदेश-तेलंगणा, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर-पश्चिम भारत, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार-झारखंड, उत्तर भारत, ईशान्य भारत, केरळ, कर्नाटक-गोवा, छत्तीसगड तसेच तमिळनाडू-पुद्दुचेरी-अंदमान निकोबार या १५ संघांचा सहभाग आहे. अनुभूती निवासी स्कूल ही या स्पर्धेची मुख्य आयोजक असून, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकार्य लाभत आहे.

    २१ साखळी सामन्यांसह एकूण २५ सामने

    स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये प्रत्येकी १५ षटकांचे सामने खेळविले जातील. उपांत्य व अंतिम सामने प्रत्येकी २० षटकांचे असतील. चार गटांमध्ये विभागलेल्या संघांमध्ये एकूण २१ साखळी सामने होतील. त्यानंतर दोन उपांत्य सामने, अंतिम सामना आणि तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना खेळविला जाणार आहे. उपांत्य फेरीत ‘अ’ गटातील संघाचा ‘ड’ गटातील संघाशी, तर ‘ब’ गटातील संघाचा ‘क’ गटातील संघाशी सामना होईल. विजेते संघ अंतिम सामन्यात, तर पराभूत संघ तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात आमनेसामने येतील.

    अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल, जैन ड्रीम स्पेस-मेहरुण तलावाजवळील मैदान तसेच एमके स्पोर्ट्स-सावखेडा येथील मैदानांवर हे सामने रंगणार आहेत. देशभरातून आलेल्या युवा क्रिकेटपटूंच्या कौशल्याचा थरार जळगावकरांना अनुभवता येणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मोबाईल बंद करून लपला, पण पोलिसांच्या तांत्रिक तपासातून सापडला; पाच महिन्यांनी अल्पवयीन मुलीचा शोध

    October 5, 2026

    सागवान तस्करीचा बेत फसला; वन विभागाच्या पथकाला पाहताच तस्कर दुचाकी सोडून पसार!

    October 5, 2026

    इन्स्टाग्रामवर भेटला, लग्नाचे वचन दिले; जळगावसह नाशिकमध्ये अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप !

    October 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.