Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » इन्स्टाग्रामवर भेटला, लग्नाचे वचन दिले; जळगावसह नाशिकमध्ये अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप !
    क्राईम

    इन्स्टाग्रामवर भेटला, लग्नाचे वचन दिले; जळगावसह नाशिकमध्ये अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप !

    editor deskBy editor deskOctober 5, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    इन्टाग्रावर ओळख झाल्यानंतर २५ वर्षीय तरुणीला लग्राचे अमिष दाखवित तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. ही धक्कादायक घटना जळगाव शहरासह नाशिक येथे नोव्हेंबर २०२५ ते १५ ऑगस्ट २०२६ दरम्यान घडली. याप्रकरणी संशयित आकाश गजानन चव्हाण (वय ३२, रा. बोरगाव, ता. अकोला, ह.मु. चित्रकुट मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील एका कंपनीत २५ वर्षीय तरुणी नोकरीस असून तीची सन २०२४ मध्ये इन्सटाग्रावर आकाश चव्हाण याच्यासोबत ओळख झाली. त्यांच्यात बोलणे सुरु असतांना आकाशने तरुणीला लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तरुणीने देखील त्याला होकार दिल्यानंतर ते एकमेकांसोबत फोनवर बोलत होते. दरम्यान, दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी आकाश हा तरुणीला भेटण्याकरीता जळगावला आला. त्याने रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल सारा येथे तरुणीला नेवून तिच्या ईच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आकाशने त्याच्या घरी तरुणीसोबत लग्नाबाबत सांगितल्यानंतर सुरुवातीला त्यांनी लग्नास नकार दिला होता. मात्र आकाशने त्यांची समजूत काढल्यानंतर त्याच्या घरच्यांनी लग्नाला होकार देत बोरगाव येथे नारळगोट्याचा कार्यक्रम देखील पार पडला.

    दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी आकाशने तो जळगावाला येत असल्याचे सांगून तरुणीला रात्रभर लॉजवर थांबण्यास सांगितले. मात्र तरुणीने नकार दिल्यानंतर तो तिला नाशिक येथे घेवून गेला. तेथे गेल्यानंतर त्याठिकाणी देखील आकाशने तरुणीवर अत्याचार केला. तरुणीने आकाशला साधेपणाने लग्न करुन घेवू असे सांगितले, मात्र आकाश हा आपण मोठे लग्न करु असे म्हणत टाळत होता. दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर तरुणीने आकाशच्या घरी फोन करुन तो सतत भांडण करत असल्याचे सांगितले. या गोष्टीचा त्याला राग आल्याने त्याने मी आता तुझ्यासोबत लग्न करणार नाही तुला काय करायचे ते कर असे तरुणीचा नंबर ब्लॉक करुन टाकला.

    तरुणीचा मोवाईल क्रमांक ब्लॉक करुन टाकल्यानंतर लग्नास नकार दिल्यामुळे तरुणीने शहर पोलीस ठाण्यात दि. ३ ऑक्टोंबर रोजी तक्रार दिली. त्यानुसार लग्राचे अमिष दाखवून तरुणीवर जळगावसह नाशिक येथे नेवून अत्याचार केल्याप्रकरणी आकाश गजानन चव्हाण (वय ३२, रा. बोरगाव, ता. अकोला, ह.मु. चित्रकुट मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जन्मदात्यांनीच घेतला मुलाचा जीव : दारूच्या व्यसनावरून मारहाण, उपचारांअभावी मृत्यू !

    October 5, 2026

    अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

    October 5, 2026

    मोबाईल बंद करून लपला, पण पोलिसांच्या तांत्रिक तपासातून सापडला; पाच महिन्यांनी अल्पवयीन मुलीचा शोध

    October 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.