Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यातील ‘या’ जिल्ह्यात बसले सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के !
    क्राईम

    राज्यातील ‘या’ जिल्ह्यात बसले सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के !

    editor deskBy editor deskOctober 3, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील हिंगोली जिल्ह्यात शनिवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सकाळी 7 वाजून 46 मिनिटांनी हलका धक्का बसल्यानंतर पावणेदहा वाजता पुन्हा मोठा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

    हिंगोली जिल्हयात मागील सात ते आठ वर्षापासून जमीनीतून आवाज व भूकंपाची मालिका सुरुच आहे. विशेषतः वसमत तालु्क्यातील पांगरा शिंदे, कळमनुरी तालु्क्यातील रामेश्‍वर तांडा या शिवारात भूकंपाचा केंद्र बिंदू आहे. या शिवाय औंढा नागनाथ तालुक्यातील वसई शिवारातही एकावेळी भूकंपाची नोंद होती. वारंवार होणाऱ्या भूकंपानंतर प्रशासनाकडून पाहणी केली जात आहे तर त्यानंतर या परिसरात भूकंपरोधक घरे व शासकिय इमारती भूकंपरोधक करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

    दरम्यान, जुलै महिन्यात झालेल्या भूकंपानंतर शनिवारी ता. 3 सकाळी सात वाजून 43 मिनीटांनी गढाळा (ता. औंढानागनाथ) केंद्रबिंदू असलेल्या ठिकाणी ३.३ रिश्‍टरस्केलचा भूकंप झाला. याभूकंपाचे धक्के पसिरात जाणवले आहेत. मात्र त्यानंतर 9 वाजून 44 मिनीटांनी भूकंपाचा जोरदार धक्का बसला असून जमीनीतून मोठा आवाज व हादरा बसला आहे. पांगरा शिंदे (ता. वसमत) या भूकंपाचे केंद्र बिंदू असून 4.5 रिश्‍टर स्केल एवढी भूकंपाची नोंद झाली आहे.

    या भूकंपाचे धक्के हिंगोली जिल्हयातील सर्वच गावांमधून कमी अधिक प्रमाणात जाणवले आहेत. पांगरा शिंदे, कुरुंदा, वापटी, कुपटी, शिरली, पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी या भागात भूकंपाची तिव्रता अधिक प्रमाणात जाणवली असून भूकंप होत असल्याचे लक्षात येताच गावकरी घराबाहेर पडले. त्यानंतर तीन मिनीटांच्या अंतराने तीन वेळी जमीनीतून आवाज आल्याचे पिंपळदरी येथील गावकरी बापुराव घोंगडे यांनी सांगितले. मात्र या आवाजाची नोंद झाली नाही.

    दरम्यान, या भूकंपामुळे कुठेही जीवीत वा वित्त हाणी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्यानंतरही या भागात जाऊन पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी क्षेत्रीय पातळीवरील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. तर नागरीकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांवरविश्‍वास ठेऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रेशनचे धान्य चक्क खासगी गोदामात : १.२५ लाखांचा शासकीय धान्यसाठा जप्त !

    October 3, 2026

    रिक्षेत बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली; एलसीबीच्या जाळ्यात तिघे आरोपी

    October 3, 2026

    धडक देऊन ट्रकचालक फरार : तरसोद बायपासवर ३५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू !

    October 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.