Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रिक्षेत बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली; एलसीबीच्या जाळ्यात तिघे आरोपी
    क्राईम

    रिक्षेत बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली; एलसीबीच्या जाळ्यात तिघे आरोपी

    editor deskBy editor deskOctober 3, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    घरी सोडण्याच्या बहाण्याने महिलेला रिक्षेत बसवून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या तिघांच्या मुसक्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीने नशिराबाद परिसरातून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास संबंधित महिला भुसावळ शहरात बाजार करून पायी घरी जात होत्या. दगडी पुलाजवळील म्हसोबा मंदिर परिसरात त्यांच्याजवळ एक रिक्षा आली. रिक्षाचालकाने घरी सोडण्याचे सांगितल्याने महिला रिक्षेत मागील बाजूस बसल्या. याच संधीचा फायदा घेत रिक्षेतील दोन व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील अंदाजे अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि रिक्षेतून पसार झाले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एलसीबी पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपासाबरोबरच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. तपास दरम्यान आरोपी नशिराबाद परिसरातील मुकेरिया हॉटेलजवळ असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी वसीम शेरअली तेली (३८, रा. फातेमा नगर, एमआयडीसी, जळगाव), अरबाज खान अय्युब खान (२६, रा. शिवाजीनगर चौक, जळगाव) आणि वसीम अजमल खान (३६, रा. साती मजार, नशिराबाद) यांना ताब्यात घेतले.

    चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल व काळे मणी असलेले मंगळसूत्र, किंमत २५ हजार रुपये, तसेच गुन्ह्यात वापरलेली एमएच-१९-व्ही-६५६३ क्रमांकाची रिक्षा, किंमत एक लाख रुपये, असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोहेकॉ अकरम शेख, किशोर पाटील, संदीप चव्हाण, गोपाळ गव्हाळे, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी व राहुल वानखेडे यांचा समावेश होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यातील ‘या’ जिल्ह्यात बसले सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के !

    October 3, 2026

    रेशनचे धान्य चक्क खासगी गोदामात : १.२५ लाखांचा शासकीय धान्यसाठा जप्त !

    October 3, 2026

    धडक देऊन ट्रकचालक फरार : तरसोद बायपासवर ३५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू !

    October 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.