Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आयटीआयजवळचा कचरा डेपो अखेर हटणार; महिनाभरात टीबी सेंटरमध्ये स्थलांतर
    क्राईम

    आयटीआयजवळचा कचरा डेपो अखेर हटणार; महिनाभरात टीबी सेंटरमध्ये स्थलांतर

    editor deskBy editor deskOctober 1, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील गव्हर्मेंट आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्र अखेर बंद करून ते टीबी सेंटर येथील कचरा संकलन डेपोत स्थलांतरित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार ही प्रक्रिया एका महिन्याच्या मुदतीत पूर्ण करण्याची माहिती उपमहापौर मनोज चौधरी व स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी दिली.

    आयटीआय परिसरातील कचरा संकलन केंद्रामुळे विद्यार्थ्यांना तसेच परिसरातील नागरिकांना होत असलेल्या त्रासाचा मुद्दा काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि गव्हर्मेंट आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी आक्रमकपणे उपस्थित केला होता. कचरा डेपो तातडीने हटविण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.

    विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत मनपा आयुक्त आदित्य जीवने, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी विद्यार्थ्यांना एका महिन्याच्या आत आयटीआयजवळील कचरा डेपो बंद करण्याचे आश्वासन दिले होते.

    या पार्श्वभूमीवर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी आज टीबी सेंटर परिसरातील प्रस्तावित कचरा संकलन केंद्राच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

    टीबी सेंटर येथील कचरा संकलन केंद्राचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित पाच टक्के काम येत्या काही दिवसांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती संबंधित मक्तेदाराचे इंजिनिअर आणि मनपा अभियंत्यांनी पाहणीदरम्यान दिली. नवीन केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर आयटीआयजवळील सध्याचे कचरा संकलन केंद्र बंद करून कचरा संकलनाची प्रक्रिया टीबी सेंटर येथे सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आयटीआय परिसरातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना कचऱ्यामुळे होणारा त्रास कमी होण्याची अपेक्षा आहे.

    विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका यावेळी उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी व्यक्त केली. आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्र दिलेल्या मुदतीत बंद करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, टीबी सेंटर येथील कामाचा सविस्तर आढावा मनपा आयुक्तांसोबत होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार आहे. उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्र बंद करून नवीन ठिकाणी कचरा संकलन प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. या पाहणीप्रसंगी प्रकल्प प्रमुख योगेश वाणी, संबंधित ठेकेदारांचे इंजिनिअर तसेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचे पीएमसी कर्मचारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गणपतीनगरातील घरफोडीचा एका दिवसात छडा; दोघे ताब्यात

    October 1, 2026

    छोट्या व्यापाऱ्यांपासून रस्त्यांवरील खड्ड्यांपर्यंत; मूलभूत सुविधांसाठी मनसेचे मनपाविरोधात धरणे आंदोलन

    October 1, 2026

    हिमाचल प्रदेशातील खुनाचे जळगाव कनेक्शन; चार आरोपी शनिपेठ पोलिसांच्या हाती

    October 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.