Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » साकेगाव बसस्थानकावर थरार : ५ ते ६ जणांच्या टोळक्याचा दोघांवर जीवघेणा हल्ला !
    क्राईम

    साकेगाव बसस्थानकावर थरार : ५ ते ६ जणांच्या टोळक्याचा दोघांवर जीवघेणा हल्ला !

    editor deskBy editor deskSeptember 30, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    तालुक्यातील साकेगाव येथील बसस्थानकाजवळ मंगळवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास दोन तरुणावर ५ ते ६ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी व काठ्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात राहुल संतोष कोळी (वय २२, रा. साकेगाव) आणि त्याचा मित्र कुणाल बाळू वाघ (वय २४) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटना घडताच स्थानिकांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

    मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे ७:४५ वाजता राहुल कोळी व कुणाल वाघ हे दोघे साकेगाव बसस्थानक परिसरात थांबलेले असताना काही संशयित अचानक तेथे आले आणि त्यांनी राहुलवर हल्ला चढवला. मध्यस्थीसाठी गेलेला कुणाल वाघ हा देखील या हल्ल्यात जखमी झाला. ऐन गर्दीच्या वेळी बसस्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी हा थरार घडल्याने साकेगाव परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून जखमींचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. भुसावळ तालुका पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

    तालुका पोलिसांचे पथक हल्लेखोरांच्या मागावर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्राथमिक तपासात हल्ल्यात सहभागी असलेले ५ ते ६ संशयित भुसावळ येथील असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांचे पथक या संशयितांच्या शोधासाठी रवाना झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कार्यालयात घुसून गोळीबार; ठाकरे गटाचे प्रदीप पूर्णेकर ठार, ठाण्यात खळबळ

    September 30, 2026

    पेन्शनच्या ऑफरची लिंक उघडली अन् खात्यातून ३.८५ लाख ट्रान्सफर; जळगावात सायबर फसवणूक

    September 30, 2026

    गावागावातील संवेदनशीलतेची माहिती मिळविण्यावर भर; एसपी कार्यालयात पोलिसांची विशेष कार्यशाळा

    September 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.