Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » माकडाच्या उडीने महिला गंभीर जखमी; उपचारादरम्यान मृत्यू!
    क्राईम

    माकडाच्या उडीने महिला गंभीर जखमी; उपचारादरम्यान मृत्यू!

    editor deskBy editor deskSeptember 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी 

    तालुक्यातील वनोली-कोसगाव परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून माकडांचा उपद्रव सुरू असून ग्रामस्थ त्रस्त आहेत. पंधरा दिवसांपूर्वी माकडाने अंगावर उड़ी मारल्याने खाली पडून गंभीर जखमी झालेल्या कौशल्याबाई साहेबराव पाटील यांचा दि. २७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. कौशल्याबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जळगाव येथे आठ-दहा दिवस उपचार केल्यानंतर त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार,  वनोली-कोसगाव परिसरात माकडांचे कळप गावात शिरून घरांवर तसेच घरातही घुसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाचे कर्मचारी येऊन केवळ सूचना देतात; मात्र माकडांचा ठोस बंदोबस्त होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. दरम्यान, पत्रकार अरुण पाटील यांनी आ. अमोल जावळे यांचे स्वीय सहाय्यक श्रीकांत यांच्याशी संपर्क साधून वनाधिकारी स्वप्निल फटांगरे यांना याबाबत माहिती दिली. येत्या आठ दिवसांत माकडांचा बंदोबस्त करून त्यांना इतरत्र हलविण्याची उपाययोजना करावी, अन्यथा वरिष्ठांकडे दाद मागितली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच मृत कौशल्याबाई यांच्या कुटुंबीयांना शासन नियमानुसार तातडीने अनुदान देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गणपती विसर्जन ठरले काळाचा घाला; तलावात बुडून तरुणाचा मृत्यू!

    September 28, 2026

    प्रताप महाविद्यालयाच्या उड्डाणपुलावर काळाचा घाला; विजय भार्गव यांचा अपघाती मृत्यू!

    September 28, 2026

    मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

    September 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.