Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पार्किंगमधून दुचाकी लंपास; सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरटा जेरबंद
    क्राईम

    पार्किंगमधून दुचाकी लंपास; सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरटा जेरबंद

    editor deskBy editor deskSeptember 27, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  : प्रतिनिधी

    शहरातील शेरा चौक परिसरातून चोरीस गेलेल्या दुचाकीचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावत एका संशयिताला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून, संशयिताकडून चोरीची एमएच-१९ डीवाय ४८७४ क्रमांकाची स्प्लेंडर प्लस दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता शेरा चौक, रजा कॉलनी, मेहरूण येथील रहिवासी फिर्यादी रमजान खान बाबू खान यांनी त्यांच्या मालकीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस कंपनीची दुचाकी एमएच-१९ डीवाय ४८७४ ही जळगाव अंजिठा चौफुली येथील इदगाह कॉम्प्लेक्ससमोर पार्क केली होती. वैयक्तिक काम आटोपून ते परत आले असता पार्किंगच्या ठिकाणी दुचाकी आढळून आली नाही. दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

    गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी चोरीस गेलेल्या दुचाकीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसेच गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला. तपासादरम्यान पोलिसांनी २३ सप्टेंबर २०२६ रोजी एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने आपले नाव तुलसीराम कल्याणसिंग कासदे, वय २८ वर्षे, रा. ८३ झाक्स, ता. भैंसदेही, जि. बैतूल (मध्य प्रदेश) असे सांगितले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडून चोरीस गेलेली एमएच-१९ डीवाय ४८७४ क्रमांकाची स्प्लेंडर प्लस दुचाकी हस्तगत करण्यात आली. पोलिसांनी संशयिताला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रवीण चौधरी करीत आहेत.

    ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापूरे तसेच पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ. पंकज धुमके, प्र.पो.उपनि. विजयसिंग पाटील, पो.ना. प्रदिप चौधरी, पो.कॉ. २४९६ रमाकांत साळुंके, पो.कॉ. १३९५ शशिकांत मराठे, पो.कॉ. योगेश धुमे यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

    September 27, 2026

    रेल्वेच्या धडकेत ४५ वर्षीय व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू!

    September 27, 2026

    धरणगाव : अल्पवयीन मुलगी गर्भवती; ४३ वर्षीय आरोपी अटकेत !

    September 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.