Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव बसस्थानकात भामट्याचा डाव; वृद्धाच्या खिशातून २१ हजारांवर डल्ला
    क्राईम

    जळगाव बसस्थानकात भामट्याचा डाव; वृद्धाच्या खिशातून २१ हजारांवर डल्ला

    editor deskBy editor deskSeptember 21, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    ‘खिशात काय आहे ते दाखवा’ असे सांगत मोहम्मद बाबू खाटीक (वय ६८, रा. आसोदा, ता. जळगाव) यांनी खिशातून २१ हजार रुपये काढताच ते घेऊन चोरटा पसार झाला. ही घटना दि. १७ सप्टेंबर रोजी नवीन बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील असोदा येथील रहिवासी असलेले मोहम्मद खाटीक हे नवीन बसस्थानक परिसरात असताना तेथे ५५ ते ६० वर्षीय अनोळखी व्यक्ती आला व त्याने ‘तुमच्या खिशात काय आहे, ते दाखवा’, असे म्हणाला. त्या वेळी खाटीक यांनी खिशात असलेले पैसे काढून दाखविले. त्या वेळी अनोळखीने त्यांच्या हाताला झटका देत २१ हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाला. या प्रकरणी मोहम्मद खाटीक यांनी दि. १९ सप्टेंबर रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रेमसंबंधानंतर लग्नाचे आश्वासन; भुसावळातील लॉजवर अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप

    September 21, 2026

    वृद्धाश्रमातून बेपत्ता; सहा दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत सापडला एकाचा मृतदेह!

    September 21, 2026

    धार्मिक कार्यक्रमासाठी गावी गेले, इकडे घरात चोरी; ५९ हजारांचा ऐवज गायब!

    September 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.