Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मनी लाँड्रिंगच्या नावाने थरकाप; गोल्ड लोन काढून निवृत्त कर्मचाऱ्याने गमावले २३.४० लाख !
    क्राईम

    मनी लाँड्रिंगच्या नावाने थरकाप; गोल्ड लोन काढून निवृत्त कर्मचाऱ्याने गमावले २३.४० लाख !

    editor deskBy editor deskSeptember 20, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :  प्रतिनिधी 

    मानवी तस्करी व मनी लाँड्रिंगसाठी तुमच्या नावे असलेल्या बैंक खात्यातून ३ कोटी रुपये काढण्यात आले आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्याकरीता पैसे परत करा अशी धमकी देत सेवानिवृत्त बँक कर्मचारी माणिक मारुती घुले (वय ७२, रा. जामनेर) यांची २३ लाख ४० हजारात ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना दि. १० ऑक्टोंबर २०२५ ते दि. १५ सप्टेंबर दरम्यान घडली. पैसे नसतांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने बँकेतून गोल्ड लोन घेत पैसे दिल्याचे उघड झाले असून याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  जामनेर येथील माणिक घुले हे स्टेट बँक ऑफ इंडियामधून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांना दि. १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी त्यांना व्हिडिओ कॉल आला. समोरील खाकी वर्दीत असलेल्यांनी दिल्ली सीबीआयचे पोलिस असल्याचे सांगितले. पोलिस असल्याची बतावणी करत त्यांनी सदाकत खान या आंतरराष्ट्रीय फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीने तुमच्या आधारकार्डचा वापर करून तुमच्या नावे सिम कार्ड घेण्यासह बँकेत खाते उघडले आहे. या खात्यातून मानवी तस्करी व मनी लॉड्रिंगसाठी ३ कोटी रुपये काढले आहे. त्यामुळे तुम्हाला अटक होऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी भीती दाखविली. तसेच तुमच्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मनी लाँड्रिंगची केस सुरू असून तुमच्याविरुद्ध वारंट येईल, मालमत्ता सील सील होईल, होईल, पोलिसांची गाडी घरी येईल असेही घुले यांना धमकावले.

    फसवणुक झालेल्या माणिक घुले यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्याची व मालमत्तेची माहिती समोरील व्यक्तीने विचारली होती. त्यावेळी घुले यांच्या बँक खात्यात ३ लाख ५० हजार रुपये होते. ती रक्कम पाठविल्यानंतरही वेगवेगळ्या प्रकारे धमकावत त्यांना पैसे जमा करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी घाबरून ७ लाख ५० हजार रुपयांचे गोल्ड लोन घेतल्याचे त्यांनी सांगितले.ओव्हर ड्रॉफ्ट बंद करून ३ लाख ५० हजार रुपये असे एकूण ११ लाख रुपये समोरील व्यक्तीने सांगितलेल्या बँक खात्यावर पाठविले. त्यानंतरही वारंवार व्हिडिओ कॉल करून धमकावत रक्कम उकळली. त्यानंतर घुले यांनी ‘निल सर्टिफिकेट’ मागितले असता, ते सर्टिफिकेट व तुमच्या पैशाचा धनादेश तुम्हाला तुमच्या पोलिस ठाण्यातून मिळेल, असे सांगितले.

    हे टाळण्यासाठी मनी लॉड्रिंगचा फंड परत करावा लागेल, हे पैसे जमा केल्यानंतर ते आरबीआयकडून परत मिळतील, असे 874 सांगण्यात आले. यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण २३ लाख ४० हजार ७० रुपये स्वीकारले. हा प्रकार सुरूच राहत पैसे परत मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले व माणिक घुले यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून किर्ती सन्यांल, दीपक शर्मा, रवी कुमार असे नाव सांगणाऱ्याऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गोडावूनचे कुलूप तोडले : २५ गॅस हंड्या लंपास; चोरट्यांचा धुमाकूळ !

    September 20, 2026

    बांभोरी पुलावरून नदीत उडी; १७ तासांच्या शोधानंतर जयश्री चौधरींचा मृतदेह सापडला

    September 20, 2026

    मेहुणबारे पोलिसांचा मास्टरस्ट्रोक : मंगळसूत्र चोरीची टोळी गजाआड; कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

    September 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.