Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ !
    जळगाव

    आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ !

    editor deskBy editor deskSeptember 16, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे वाटप

    जळगाव : प्रतिनिधी 

    समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत सन २०२६-२७ मध्ये प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे. या योजनेंतर्गत समाज कल्याण विभागास एकूण २०८ प्रस्ताव प्राप्त झाले असून, यावर्षी उपलब्ध तरतुदीनुसार रु. ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

    यामधून ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे., कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकार करिश्मा नायर यांचे हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले.यावेळी संबंधित लाभर्थ्यांना करिश्मा नायर यांनी भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रभारी समाजकल्याण अधिकारी भाऊसाहेब अकलाडे उपस्थित होते.
    आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देऊन सामाजिक सलोखा, समता आणि सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाचा भर आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरीचा पर्दाफाश : स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात संशयित !

    September 16, 2026

    स्व. रावसाहेब माधवराव पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ धानवड येथे जाहीर कीर्तन

    September 16, 2026

    रेशन धान्याच्या कथित गैरव्यवहारावरून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.