Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांनी ४ लाखांचा गुटखा पकडला !
    क्राईम

    किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांनी ४ लाखांचा गुटखा पकडला !

    editor deskBy editor deskSeptember 16, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील मेहुणबारे पोलिसांनी दहिवद येथील बसस्थानकावर सोमवारी रात्री केलेल्या कारवाईत ओमनी वाहनातून सुमारे ३ लाख ३२ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित विमल पानमसाला व तंबाखू जप्त केला. गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेली सुमारे १ लाख रुपये किमतीची ओमनी व १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण ४ लाख ४७ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी मेहुणबारे येथील हितेश अनिल अहिरराव (वय २७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मेहुणबारे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास शिरोळ, हवालदार मिलिंद कुमावत, प्रकाश कोळी, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग पाटील, दीपक महाजन हे सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी दहिवद गावातील बसस्थानकावर (एमएच १८ एस ६६२) क्रमांकाची ओमनी संशयास्पदरीत्या उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच वाहनचालकाची भंबेरी उडाली. पोलिसांनी वाहनातील मालाबाबत विचारणा केली असता चालकाने किराणा माल असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चालकासह वाहन मेहुणबारे पोलिस ठाण्यात आणले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास घातक असलेला विमल पानमसाला व तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला.

    पोलिसांनी चालक हितेश अनिल अहिरराव याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर गुटखा धुळे येथील बिलाल (पूर्ण नाव माहित नाही) याच्याकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. प्रतिबंधित गुटख्याची विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुटख्यासह ओमनी व मोबाईल असा एकूण ४ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले या करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रेशन धान्याच्या कथित गैरव्यवहारावरून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

    September 16, 2026

    गुलाल उधळताना वाद पेटला : दोन भावांवर दगडफेक; नातेवाईकांच्या कारचीही तोडफोड

    September 16, 2026

    पोषण आहाराच्या धान्याच्या टेम्पोला अपघात; दोन हमालांचा दुर्दैवी मृत्यू

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.