Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रिंगरोडवरील सीएमएस कंपनीची फसवणूक करणाऱ्याला पुण्यातून अटक
    क्राईम

    रिंगरोडवरील सीएमएस कंपनीची फसवणूक करणाऱ्याला पुण्यातून अटक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 3, 2022Updated:August 5, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: रिंगरोडवरील सीएमएस कंपनीच्या जळगावच्या शाखा मॅनेजरने कंपनीच्या खात्यात रक्कम न भरता तब्बल ३३ लाख २९ हजार १८१ रूपयांचा अपहार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अडीच वर्षांपासून फरार असलेल्या संशयिताला जिल्हापेठ पोलीसांनी पुण्यातून अटक केली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील रिंगरोडवर नाशिक येथील सीएमएस नावाची कंपनीची शाखा आहे. या शाखेत २०१८ मध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून महेंद्र पांडूरंग झोंबाडे (वय-३४) रा. चाकण आगरवाड, पुणे हा काम पाहत होता. जळगाव शाखेचे कामकाज झोंबाडे कामकाज पाहत होता. कंपनीचे पुण्यातील वरीष्ठ व्यवस्थापक मुकुंद ओव्हळ हे सप्टेंबर २०१९ मध्ये कंपनीचे खात्याची तपासणी करत असतांना त्यांना रेल्वेकडील येणाऱ्या रकमेपैकी ३३ लाख २९ हजार १८१ रूपये खात्या आले नाही. याबाबत महेंद्र झोंबाडे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कंपनीचे अधिकारी यांनी जळगावला आल्यानंतर महेंद्र झोंबाडे यांनी अपहार केल्याचे कबुली देवून लवकर सर्व पैसे परत असल्याचे आश्वासन देवून १०० रूपयांचे स्टॅम्प पेपर आणि नोटरी देखील करून दिली. तरीही पैसे दिले नसल्याने याबाबत ६ फेबुवारी २०२० रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी महेंद्र पांडूरंग झोंबाडे याच्या विरोधात अपहार व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी महेंद्र पांडूरंग झोंबाडे हा फरार झाला होता. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पो.कॉ. गणेश निकम, पोहेकॉ फिरोज तडवी यांनी रविवारी ३१ जुलै रोजी दुपारी संशयित महेंद्र पांडूरंग झोंबाडे याला तब्बल अडीच वर्षानंतर पुण्यातून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.