Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला : मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात !
    क्राईम

    बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला : मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskSeptember 15, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    रामेश्वर कॉलनीतील २८ वर्षीय महिला बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात पद्यालयच्या जंगलात तिचा दगडाने चेहरा ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. कविता मिस्तरी (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिच्यासोबत गेल्याचे समोर आलेला मित्र नरेश उर्फ आबा अनिल सोनवणे (वय २८, रा. रामेश्वर कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  कविता या दोन मुलांसोबत राहत होत्या. त्या गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पतीपासून विभक्त होत्या. ८ सप्टेंबरपासून त्या वेपत्ता होत्या. याबाबत ९ सप्टेंबरला पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान कविता या नरेश सोनवणे याच्यासोबत दुचाकीवरून जाताना दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला. कविताच्या मोबाइलचे लोकेशन तपासले असता महसावदजवळ मोबाइल बंद झाल्याचे समोर आले त्यानंतर पोलिसांनी पद्मालयच्या जंगल परिसरात शोध घेतला. तेथे दगडाने चेहरा ठेचलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. कविताने घरातून निघताना घातलेले कपडे कुटुंबीयांनी ओळखले.

    कविता व नरेश एकत्र गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जळगावपासून म्हसावदपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या मार्गावर दोघे जाताना दिसले; मात्र महसावदनंतर पुढील फुटेजमध्ये ते आढळले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी एरंडोलच्या दिशेनेही सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेथेही दोघांचा ठावठिकाणा लागला नाही. त्याचवेळी मोबाइल लोकेशन तपासले असता कविताचा मोबाइल म्हसावदजवळ बंद झाल्याचे स्पष्ट झाले. या धाग्यावरून पोलिसांनी पद्मालयच्या जंगल परिसरात शोध घेतला. तेथे कविताचा मृतदेह आढळला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मुक्ताईनगर-नायगाव फाट्यावर मृत्यूचा थरार! भरधाव सिमेंट मिक्सरने दुचाकीस्वाराला चिरडलं; जागीच अंत

    September 14, 2026

    मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक !

    September 14, 2026

    ​केन्द्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना !

    September 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.