Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणाच्या खून प्रकरणातील एकाला अटक ; पारोळा पोलिसांची कारवाई !
    क्राईम

    तरुणाच्या खून प्रकरणातील एकाला अटक ; पारोळा पोलिसांची कारवाई !

    editor deskBy editor deskSeptember 12, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  : प्रतिनिधी 

    पारोळा तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथे जुन्या वादातून १८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून खून केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पारोळा पोलिसांनी अवघ्या काही तासांत राजवड येथील घनदाट जंगलातून जेरबंद केले.

    मिळालेल्या माहितीनुसार,  पळासखेडे बुद्रुक येथील अंकुश नेहरू पाटील (वय ३०) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून खुनासाठी वापरलेला चाकूही पोलिसांनी हस्तगत केला आहे. मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे. दरम्यान, पळासखेडे बुद्रुक येथे १० सप्टेंबरला दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास रवींद्र सुकदेव पाटील यांच्या शेताजवळ मयूर दुर्वास पाटील आणि अंकुश नेहरू पाटील यांच्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद सोडवण्यासाठी काही ग्रामस्थांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती अचानक चिघळली. अंकुश पाटील याने खिशातून चाकू काढून मयूर पाटील याच्या पोटावर वार केले. या हल्ल्यात मयूर गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. हल्ल्यानंतर आरोपीने उपस्थित ग्रामस्थांना चाकूचा धाक दाखवत घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर मयूरला नागरिकांनी दुचाकीने तातडीने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, पोटावर झालेल्या गंभीर जखमांमधून मोठा रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते व पारोळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते.

    आरोपी फरार झाल्याने त्याच्या शोधासाठी
    पो.नि. दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनात स.पो. नि. योगेश महाजन, पो.उ.नि. विजय भोंबे यांच्या नेतृत्वात स्वतंत्र पथके रवाना केली होती. गोपनीय विभाग व डीपी पथकानेही आरोपीच्या हालचालींचा माग काढला. अखेर पोलिसांना आरोपी राजवड परिसरातील जंगलात लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री राजवड येथील घनदाट जंगलात शोधमोहीम राबवत पहाटे तीन वाजेच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला. आरोपीला अटक करून पारोळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते करत आहेत.

    मयूर पाटीलच्या खुनाची वार्ता पसरताच पळासखेडे बुद्रुकसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नागरिकांनी पारोळा पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. नातेवाईक व ग्रामस्थांनी मयूरच्या मृत्यूने आक्रोश केला. ११ सप्टेंबरला दुपारी दोन वाजेच्या सुमारास पळासखेडे बुद्रुक येथे मयूरच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गिरणेच्या वाळूची चोरटी वाहतूक; जळगावात दोन ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई

    September 12, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

    September 12, 2026

    वडिलांना नवीन घर घेतले मुलाने काही दिवसात त्याच घरात घेतला टोकाचा निर्णय !

    September 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.