Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वडिलांना नवीन घर घेतले मुलाने काही दिवसात त्याच घरात घेतला टोकाचा निर्णय !
    क्राईम

    वडिलांना नवीन घर घेतले मुलाने काही दिवसात त्याच घरात घेतला टोकाचा निर्णय !

    editor deskBy editor deskSeptember 12, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरात अवघ्या १२ वर्षांच्या एका शाळकरी मुलाने घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या चिमुकल्याने इतक्या लहान वयात टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. रोहित राहुल चौधरी (वय १२, मूळ रा. लक्ष्मी नगर, जळगाव) असे या मुलाचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  रोहित हा भुसावळ येथील एका हॉस्टेलमध्ये राहून तिथल्याच शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वीच तो जळगावला आपल्या घरी आला होता. रोहितच्या वडिलांनी नुकतेच शहरातील खडके चाळ भागात एक नवीन घर घेतले होते आणि याच नव्या वास्तूत ही दुर्दैवी घटना घडली. ९ सप्टेंबर रोजी रात्री जेवण झाल्यानंतर रोहित आपल्या घरातून ‘मी नव्या घरात झोपायला जातो’ असे सांगून खडके चाळ येथील नव्या घरी गेला होता. त्यानंतर, शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास रोहितची आई रूपाली या नव्या घरात गेल्या.

    मात्र, आत प्रवेश करताच रोहित गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलाला अशा अवस्थेत पाहताच त्यांनी जागीच हंबरडा फोडला.रूपाली यांचा आक्रोश ऐकून आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. त्यांनी तातडीने रोहितला खाली उतरवून जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रोहितला मृत घोषित केले. रोहितचे वडील राहुल चौधरी हे हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलाच्या या अचानक जाण्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात रोहितने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके का उचलले, याचा पुढील तपास जळगाव शहर पोलीस करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तरुणाच्या खून प्रकरणातील एकाला अटक ; पारोळा पोलिसांची कारवाई !

    September 12, 2026

    गिरणेच्या वाळूची चोरटी वाहतूक; जळगावात दोन ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई

    September 12, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

    September 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.