Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सलग दुसऱ्यांदा खासदार स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर जळगावच्या जनतेच्या विश्वासाला मानाची पावती
    जळगाव

    सलग दुसऱ्यांदा खासदार स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर जळगावच्या जनतेच्या विश्वासाला मानाची पावती

    editor deskBy editor deskSeptember 11, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांना प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला असून, हा सन्मान त्यांना सलग दुसऱ्या वर्षी मिळाला आहे. संसदेतील प्रभावी उपस्थिती, जनहिताचे प्रश्न सातत्याने मांडणे आणि लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.

    पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना खासदार स्मिता वाघ यांनी हा गौरव केवळ वैयक्तिक नसून जळगाव लोकसभा मतदारसंघातील जनतेने दाखविलेल्या विश्वासाचा सन्मान असल्याचे सांगितले. संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, विकासकामांसाठी केलेल्या मागण्या आणि जनहितासाठी घेतलेले विविध पुढाकार यामागे मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा व समस्या केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले तसेच “गतवर्षी मिळालेल्या पहिल्या ‘संसद रत्न’ सन्मानाने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा दिली. सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या पुरस्कारामुळे जनतेप्रती असलेली जबाबदारी आणखी वाढली आहे,” असे त्या म्हणाल्या.

    यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन व विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संसद रत्न पुरस्कार समिती, ज्युरी सदस्य, संसदीय सहकारी, भाजप परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते, सहकारी आणि शुभेच्छुकांचेही त्यांनी आभार मानले.

    ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ प्राप्त झालेल्या सर्व सहकारी खासदारांचे अभिनंदन करताना, जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची प्रेरणा या सन्मानातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले व खासदार स्मिता वाघ यांना सलग दुसऱ्यांदा प्राप्त झालेल्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल जळगाव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावरील छोट्या व्यवसायांसाठी मनसेचा आवाज; आयुक्तांची सकारात्मक ग्वाही !

    September 11, 2026

    पहाटे अंधारात ‘चोरीच्या’ तयारीत बसला; पोलिसांची नजर पडताच उडवाउडवीची उत्तरे!

    September 11, 2026

    जळगावात ‘साधू’ बनून भामट्यांचा धुमाकूळ : वृद्धाची ७० हजारांची अंगठी लंपास !

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.