Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूचे वार करीत हत्या : संशयीत ताब्यात !
    क्राईम

    धक्कादायक : भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूचे वार करीत हत्या : संशयीत ताब्यात !

    editor deskBy editor deskSeptember 11, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    शहरातील 35 वर्षीय रेल्वे कर्मचारी असलेल्या तरुणाची चाकूचे वार करीत हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना गुरुवार, 10 रोजी रात्री 8.30 वाजेनंतर शहरातील पाटीलमळा भागात घडली. तुषार गोविंद सोनवणे (35, समता नगर, भुसावळ) असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. खुनाचे स्पष्ट कारण मात्र कळू शकले नाही.

    पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तुषार सोनवणे हा तरुण भुसावळ रेल्वेत नोकरीला असल्याची प्राथमिक माहिती आहे. गुरुवरी रात्री तुषार हा परिचिताची दुचाकी (एम.एच.19 सी.एच.1405) घेवून पाटीलमळा भागातून जात असताना अल्पवयीन संशयीताशी त्याचा कुठल्यातरी कारणातून वाद झाला व संशयीताने पाठीमागून डोक्याखाली व पाठीवरील भागात चाकूचे सपासप वार केल्याने अतिरक्तस्त्रावाने जागीच तरुणाचा मृत्यू झाला.गुरुवारी रात्री साडेआठ वाजेनंतर पोलिसांच्या 112 क्रमांकावर आलेल्या दूरध्वनीनंतर बाजारपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जळगाव गुन्हे शाखेतील पथकाचे कर्मचारी शहरात असल्याने त्यांनी संशयीत पायी पसार झालेल्या मार्गाने धाव घेत मिळालेल्या माहितीवरून अल्पवयीनास ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

    पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकालाही यावेळी पाचारण करण्यात आले. भुसावळ शहर व विभागात पोळा सण उत्साह व शांततेत पार पडल्यानंतर रात्रीच्या सुमारास झालेल्या निघृण खुनामुळे शांततेवर विरजण पडले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावात ‘साधू’ बनून भामट्यांचा धुमाकूळ : वृद्धाची ७० हजारांची अंगठी लंपास !

    September 11, 2026

    बस-पिकअपच्या भीषण धडकेत चालकाचा मृत्यू; दोघे गंभीर

    September 11, 2026

    १८ वर्षीय तरुणाच्या खुनाने पारोळा हादरले ; संशयित आरोपी फरार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.