Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोबाईल हिसकावला अन् दुचाकीवरून पसार होण्याचा प्रयत्न; पोलिसांनी दोघांना जागेवरच पकडले!
    क्राईम

    मोबाईल हिसकावला अन् दुचाकीवरून पसार होण्याचा प्रयत्न; पोलिसांनी दोघांना जागेवरच पकडले!

    editor deskBy editor deskSeptember 9, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    आकाशवाणी चौक परिसरात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोबाईल हिसकावून मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पकडण्यात आले. पोलिसांनी संशयितांची मोटारसायकल ताब्यात घेत पीडिताचा मोबाईल त्याच्याकडे परत केला. त्यानंतर दोन्ही संशयित व मोटारसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, एएसआय दीपक बनसोडे (ब.नं. २७१०) आणि पोलिस कॉन्स्टेबल भूषण मोरे (ब.नं. ७०२) हे आकाशवाणी चौक येथे वाहतूक पॉईंट ड्युटीवर होते. त्यांची ड्युटी सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत होती.

    दरम्यान, दत्त मंदिराजवळून एक व्यक्ती जात असताना दोघा इसमांनी त्याला अडवून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर दोघांनी मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहतूक कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून दोघांना अडविले.

    पोलिसांनी संशयितांकडून MH 19 ET 8367 क्रमांकाची मोटारसायकल ताब्यात घेतली. तसेच त्यांच्या ताब्यात असलेला पीडिताचा मोबाईल हस्तगत करून तो संबंधित व्यक्तीकडे परत करण्यात आला.

    घटनेची माहिती पोलिसांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला वायरलेसद्वारे दिली. त्यानंतर दोन्ही संशयित आरोपी आणि त्यांची मोटारसायकल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या ठाणे अंमलदारांच्या ताब्यात देण्यात आली.

    पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे मोबाईल हिसकावून पसार होण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वेळीच रोखण्यात यश आले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    घटस्फोटित पतीसोबतचे फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल; महिलेची बदनामी, शनिपेठ पोलिसात गुन्हा!

    September 9, 2026

    भंगार दुकाने ते अवैध धंदे; जळगाव पोलिसांच्या ‘ऑपरेशन ३०५’ने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ!

    September 9, 2026

    तुरीच्या शेतात फुलला ‘गांजा’; अडावद पोलिसांची धडक कारवाई, एक जण ताब्यात!

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.