
जळगाव : प्रतिनिधी
घटस्फोट झालेल्या पतीसोबतचे फोटो पीडित महिलेसह तिच्या नातेवाईकांच्या व्हाट्सअॅपर पाठवून त्यांची बदनामी केली. ही घटना दि. २८ ऑगस्ट ते दि. ६ सप्टेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात २६ वर्षीय महिला वास्तव्यास आहे. दरम्यान, त्या विवाहितेचे तिच्या घटस्फोट झालेल्या पतीसोबतचे फोटो तिच्या संमतीशिवाय मानसिक त्रास देवून समाजात बदनामी करण्याच्या उद्देशाने संशयित हा तिच्या नातेवाईकांना पाठवित आहे. तसेच सोशल मीडियावर देखील व्हायरल करीत असल्यामुळे पीडितेची समाजात बदनामी होत आहे. दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच पीडितेने शनिपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास परि. उपनिरीक्षक संतोश खेजकर हे करीत आहे.



