Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव एसीबीची कारवाई : दोनशे रुपयांची लाच घेतांना कर्मचारी अटकेत !
    क्राईम

    जळगाव एसीबीची कारवाई : दोनशे रुपयांची लाच घेतांना कर्मचारी अटकेत !

    editor deskBy editor deskSeptember 9, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला अवघ्या २०० रुपयाची स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. भगवान रोहिदास गायकवाड (वय ५१) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली.

    तक्रारदार यांनी जामनेर तालुक्यातील त्यांच्या शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी २ सप्टेंबर २०२६ रोजी जामनेरच्या भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. मोजणीनंतर आवश्यक असलेल्या स्कीम पत्रक व टिपण उताऱ्याच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी लोकसेवक भगवान गायकवाड यांनी ७०० रुपयांची मागणी केल्याची तक्रार ७ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

    तक्रारीच्या अनुषंगाने ८ सप्टेंबर रोजी जामनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयात पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी गायकवाड यांनी तडजोडीअंती २०० रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. गायकवाड यांनी पंचांसमक्ष २०० रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.

    ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस हवालदार बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण ठाकूर आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन चाटे यांचा समावेश होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सामाजिक वनीकरण कार्यालय ‘रामभरोसे’; शासकीय कर्मचारी नसलेल्या व्यक्तीकडे कार्यालयाच्या चाव्या!

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026

    मोबाईल हिसकावला अन् दुचाकीवरून पसार होण्याचा प्रयत्न; पोलिसांनी दोघांना जागेवरच पकडले!

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.