Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्र्यांच्या नावाने एआय व्हिडिओ अन् फेक अकाउंट; चेन्नई सायबर क्राईमची नशिराबादमध्ये धडक!
    क्राईम

    मुख्यमंत्र्यांच्या नावाने एआय व्हिडिओ अन् फेक अकाउंट; चेन्नई सायबर क्राईमची नशिराबादमध्ये धडक!

    editor deskBy editor deskSeptember 9, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर एआय जनरेटेड व्हिडिओ तसेच विविध पोस्ट प्रसारित केल्याच्या प्रकरणाने आता नशिराबादपर्यंत धडक घेतली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी चेन्नई वेस्ट झोन सायबर क्राईम पोलिसांचे पथक नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, नशिराबाद येथील होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन (रा. ताजनगर) याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

    सी. जोसेफ विजय हे सध्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री असून (टीव्हीके) या पक्षाचे प्रमुख आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने अथवा त्यांच्या ओळखीचा आभास निर्माण करणारे सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यात आल्याचा संशय आहे. या अकाउंटवर एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेले व्हिडिओ, डिजिटल स्वरूपातील छायाचित्रे तसेच विविध पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचे तपास यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान, चेन्नई सायबर क्राईम पथकाकडून संबंधित सोशल मीडिया अकाउंट्सच्या वापराबाबत आयपी लॉग, डिजिटल उपकरणे, लिंक्ड अकाउंट्स, ई-मेल, मोबाईल क्रमांक, सबस्क्रायबर तपशील आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, नशिराबाद पोलीस ठाण्यात मोहम्मद जुनेद शेख याची चौकशी सुरू असल्याचे समजते. तपासातील निष्कर्ष आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार असून, त्याला पुढील तपासासाठी चेन्नई येथे नेले जाण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मोबाईल हिसकावला अन् दुचाकीवरून पसार होण्याचा प्रयत्न; पोलिसांनी दोघांना जागेवरच पकडले!

    September 9, 2026

    घटस्फोटित पतीसोबतचे फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल; महिलेची बदनामी, शनिपेठ पोलिसात गुन्हा!

    September 9, 2026

    भंगार दुकाने ते अवैध धंदे; जळगाव पोलिसांच्या ‘ऑपरेशन ३०५’ने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ!

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.