Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शासकीय तांदळावर डल्ला? ‘महासर माता राईस मिल’वर मध्यरात्री झाडाझडती; नमुने जप्त
    क्राईम

    शासकीय तांदळावर डल्ला? ‘महासर माता राईस मिल’वर मध्यरात्री झाडाझडती; नमुने जप्त

    editor deskBy editor deskSeptember 8, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२६ 

    पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील सावखेडा रस्त्यावर असलेल्या ‘महासर माता राईस मिल’वर दि. ७ सप्टेंबरच्या मध्यरात्री तहसीलदार व पुरवठा विभागाने अचानक धाड टाकत मोठी कारवाई केली. भडगाव परिसरात रेशनचा ट्रक पकडल्यानंतर या मिलचा काळाबाजार उघडकीस आला. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास झालेल्या या गुप्त कारवाईने महसूल व पुरवठा वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या राईस मिलमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीचा (रेशनिंगचा) मोठ्‌या प्रमाणावर तांदूळ साठवून ठेवल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. शासकीय योजनेतून गोरगरीब व गरजू लाभार्थ्यांसाठी मिळणारे धान्य बेकायदेशीररीत्या गोळा करून ते राईस मिलमध्ये पॉलिश करायचे आणि खुल्या बाजारात चढ्या भावाने विकायचे, असा संशय व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री झालेल्या या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी मिलमधील तांदळाचा साठा, आवक-जावक रजिस्टर आणि संबंधित कागदपत्रांची सखोल झाडाझडती घेतली. कारवाईदरम्यान पुरवठा विभागाच्या पथकाने तांदळाचे विविध नमुने जप्त केले असून ते अधिकृत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. हा तांदूळ रेशनचाच असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित मिल मालकावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. केवळ नमुने घेऊन हे प्रकरण गुंडाळू नये, तर हा धान्यसाठा मिलपर्यंत पोहोचवणारे वाहतूकदार, स्थानिक दलाल आणि या गैरप्रकाराला पाठीशी घालणाऱ्या घटकांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी पाचोरा तालुक्यातील जनतेकडून केली जात आहे.
    परिसरात तांदूळची शेती होत नसताना देखील या कंपनीला परवानगी मिळाली कशी ? हा विषय पण अनेकांच्या भुवया उंचावणारा असून गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी शासनाचा तांदूळ सर्रासपणे घेऊन त्यावर प्रक्रिया करून खुल्या बाजारात चढ्या भावाने विक्री केला जातो.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बी.जे.मार्केटमध्ये रक्तरंजित थरार : चिकन विक्रेत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला !

    September 8, 2026

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई; एकाच दिवसात १४ जणांना जिल्हाबंदी

    September 8, 2026

    जामदा फाट्यावर काळाचा घाला! बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

    September 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.