Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जामदा फाट्यावर काळाचा घाला! बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
    क्राईम

    जामदा फाट्यावर काळाचा घाला! बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

    editor deskBy editor deskSeptember 8, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : वृत्तसंस्था 

    तालुक्यातील मेहुणबारे येथील जामदा फाट्यावर उभ्या असलेल्या २९ वर्षीय तरुणीला बसने जोरदार धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात प्राची महेंद्र पवार (वय २९, रा. नवेगाव, मेहुणबारे) हिचा मृत्यू झाला. घटनेमुळे मेहुणबारे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, प्राची पवार ही ७ सप्टेंबर रोजी सकाळी चाळीसगाव येथे राहणाऱ्या आपल्या काकूला भेटण्यासाठी घरातून निघाली होती. दरम्यान, जामदा फाट्याजवळ ती उभी असताना धुळ्याकडून येणाऱ्या बसने (एमएच ४९, बीझेड ८२७६) तिला जोरदार धडक दिली.

    अपघाताची माहिती मिळताच प्राचीचे वडील महेंद्र पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी प्राची बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णवाहिकेतून मेहुणबारे येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.

    या घटनेने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अपघातप्रकरणी महेंद्र नारायण पवार यांच्या फिर्यादीवरून बसचालक नीलेश अशोक सोळंके (रा. वलठाण, ता. सोयगाव) यांच्याविरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शासकीय तांदळावर डल्ला? ‘महासर माता राईस मिल’वर मध्यरात्री झाडाझडती; नमुने जप्त

    September 8, 2026

    बी.जे.मार्केटमध्ये रक्तरंजित थरार : चिकन विक्रेत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला !

    September 8, 2026

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई; एकाच दिवसात १४ जणांना जिल्हाबंदी

    September 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.