Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावचे नवे प्रांताधिकारी योगेशकुमार मीना; विनय गोसावी यांची बदली
    जळगाव

    जळगावचे नवे प्रांताधिकारी योगेशकुमार मीना; विनय गोसावी यांची बदली

    editor deskBy editor deskSeptember 4, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी योगेशकुमार मीना यांची जळगावचे प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने गुरुवारी भारतीय प्रशासन सेवेतील दहा अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. त्यानुसार जळगावचे विद्यमान प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या जागी योगेशकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    योगेशकुमार मीना हे सध्या हिंगोली येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. राज्य शासनाच्या नव्या नियुक्ती आदेशानुसार त्यांच्यावर आता जळगाव प्रांताधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते सोमवारी जळगाव येथे प्रांताधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    मीना हे २०२४ च्या तुकडीतील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असून, त्यांनी बी.टेक.पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, हिंगोली येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम करताना प्रशासकीय अनुभव मिळविला आहे.

    जळगाव प्रांताधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून महसूल प्रशासन, निवडणूक प्रक्रिया, आपत्ती व्यवस्थापन, नागरिकांच्या विविध प्रशासकीय प्रश्नांसह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात. त्यामुळे मीना यांच्या नियुक्तीकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

    दरम्यान, विनय गोसावी यांच्या पुढील नियुक्तीबाबत राज्य शासनाच्या गुरुवारी जारी झालेल्या आदेशात कोणताही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या पुढील नियुक्तीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

    योगेशकुमार मीना सोमवारी जळगावचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यकाळाला अधिकृत सुरुवात होणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जळगावच्या महसूल प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल झाला असून, नव्या प्रांताधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या प्रश्नांना तत्पर प्रतिसाद आणि प्रभावी प्रशासनाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा !

    September 4, 2026

    प्रेमी युगुलांना ब्लॅकमेल करणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांचा दणका; टेकडीवर दामिनीची नजर

    September 4, 2026

    आनंदाची बातमी : ‘या’ एक्सप्रेसला मिळाला धरणगाव येथे थांबा !

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.