
यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरातून बोलावून नेत तिच्यावर स्मशानभूमीच्या आवारात नेवून अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला पहाटेच्या सुमारास घराजवळ आणून सोडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित साबीर पिंजारी (वय २२) याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबिय नातेवाईकांकडे गेलेले असतांना घरी एकट्या असलेल्या १४ वर्षीय मुलीला संशयित साबीर उर्फ आसीफ पिंजारी याने रात्री १० वाजेच्या सुमारास घराबाहेर बोलावले. त्यानंतर तिला स्मशानभूमी परिसरात नेवून तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर पीडितेला घराजवळ सोडून तो तिथून निघून गेला. हा प्रकार पीडित अल्पवयीन मुलीच्या काकाच्या निदर्शनास आल्यानंतर तीने घडलेली घटना कथन केली. याप्रकरणी पीडितेच्या काकाने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित साबीर उर्फ आसीफ पिंजारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक अजयकुमार वाढवे करीत आहे.



