Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा आरोप; बोदवडमध्ये संतप्त जमावाचा उद्रेक, दोन दुचाकींची जाळपोळ
    क्राईम

    अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा आरोप; बोदवडमध्ये संतप्त जमावाचा उद्रेक, दोन दुचाकींची जाळपोळ

    editor deskBy editor deskSeptember 3, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    बोदवड शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या बाजुला असलेल्या खासगी क्लासेसमधील एका शिक्षकाने मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी संशयिताला मारहाण केली. या वेळी त्या शिक्षकाच्या नातेवाईकाने त्याला एका घरात डांबून ठेवले. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दोन दुचाकी जाळल्या. तर, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या वेळी संतप्त नागरिकांनी त्या शिक्षकाला ताब्यात देण्याची मागणी करत रात्री उशिरापर्यंत ठिय्या मांडला. तर, पोलीस नागरिकांची रात्री उशिरापर्यंत समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, रात्री उशिरा एसपी आल्यानंतर शिताफीने संशयिताला जळगाव येथे नेण्यात पोलिसांना यश आले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  बोदवड शहरातील शासकीय विश्राम गृहाच्या बाजुलाच एक खासगी क्लासेस आहे. तेथील एका शिक्षकाने बोदवड शहरापासून जवळच असलेल्या एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. याबाबत पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांना बुधवारी रात्री माहिती मिळताच त्यांनी बोदवड शहर गाठले. त्यानंतर त्या खासगी क्लासेसच्या शिक्षकाला जाब विचारत त्याला मारहाण केली. या दरम्यान, संशयित शिक्षक एका नातेवाईकाच्या घरात शिरला. त्याच्या नातेवाईकाने त्याला एका घरात कोंबून ठेवले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. तसेच घटनेचे गांभिर्य पाहुन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. दरम्यान, परिसरातील अनेक गावातील मुली या क्लासेसमध्ये शिक्षण घेतात. त्यामुळे संबंधित गावातील संतप्त ग्रामस्थांनी ही बोदवड येथे धाव घेतली. बोदवड शहरासह परिसरातील गावातील ग्रामस्थांनी त्या शिक्षकाला डांबून ठेवलेल्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. या वेळी संतप्त जमावाने संशयित आरोपी शिक्षकाला ताब्यात देण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत पोलीस त्या आरोपी शिक्षकाची चौकशी करत होते. डीवायएसपींसह दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले होते. जमाव संतप्त झाल्याने बोदवडसह परिसरातील मुक्ताईनगर, भुसावळ, वरणगाव पोलीस घटनास्थळी ठाण मांडून होते.

    दरम्यान, या शिक्षकाने अशाच पद्धतीने ब्लॅकमेल करुन अनेक अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढल्याची चर्चा यावेळी सुरु होती. या क्लासेसमध्ये परिसरातील बऱ्याच गावातील विद्यार्थीनी शिक्षण घेत असल्याने स्थानिक नागरिकांच्या संतापात भर पडली आहे. हा संशयित शिक्षक मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. तर अनेक मुलींसोबत त्याने अश्लिल कृत्य केल्याचेही चर्चा केली जात होती. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दोन दुचाकींची जाळपोळ केली. परंतु, पोलिसांनी तत्काळ धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. तर घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे पोलीस पथकासह बोदवड येथे रवाना झाले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खाऊचे आमिष अन् चिकूच्या मळ्यात अत्याचाराचा आरोप; नशिराबादमध्ये खळबळ

    September 3, 2026

    यावल तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा आरोप; पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

    September 3, 2026

    ५०% परताव्याचे आमिष अन् ‘टास्क’च्या जाळ्यात अडकले : लाखांची ऑनलाइन फसवणूक

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.