Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा धडाका; ११.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त
    क्राईम

    जळगावात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा धडाका; ११.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

    editor deskBy editor deskSeptember 1, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२६

    जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या धडक मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत इफेड्रिन व गांजा असा एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत मेहरुण येथील ५५ वर्षीय नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल याला ताब्यात घेण्यात आले आहे.

    स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना एमआयडीसी परिसरात इफेड्रिन या अंमली पदार्थाची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अशोक मोहन काळे यांना कारवाईसाठी नियुक्त करण्यात आले.

    उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या कायदेशीर परवानगीने तसेच राजपत्रित अधिकारी चंद्रकांत अरुण बोडरे आणि पंचांच्या उपस्थितीत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.४० वाजता एमआयडीसी परिसरातील नारियलवाला बाबा दर्ग्यासमोरील रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला.

    दरम्यान, काळ्या रंगाच्या बर्गमन मोपेडवरून नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल हा येताना पोलिसांना दिसला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

    त्यानंतर पंचांसमक्ष त्याच्या ताब्यातील मोपेडच्या डिक्कीची झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये १ किलो ९६३ ग्रॅम वजनाची पांढऱ्या रंगाची स्फटिकयुक्त पावडर आढळून आली. प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत हा पदार्थ इफेड्रिन असल्याचे निष्पन्न झाले. त्याची किंमत सुमारे ९ लाख ८१ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    याशिवाय त्याच्याकडून २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत १ लाख ५ हजार ७०० रुपये आहे. अंमली पदार्थांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची बर्गमन मोपेड (क्रमांक एमएच-१९-ईके-४३०५) देखील पोलिसांनी जप्त केली असून तिची किंमत ३० हजार रुपये आहे.

    अशाप्रकारे इफेड्रिन १ किलो ९६३ ग्रॅम, गांजा २ किलो ११४ ग्रॅम आणि मोपेड असा एकूण ४ किलो ७७ ग्रॅम वजनाचा ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.

    या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक प्रभाकर जगदाळे यांच्या फिर्यादीवरून नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७०४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ९(अ), २५(अ), ८(क) सह २०(ब)(ii) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

    दरम्यान, जप्त केलेल्या रासायनिक पदार्थाची प्राथमिक फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये संबंधित पदार्थ इफेड्रिन असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने इफेड्रिनचा वापर एमडीसारख्या अंमली पदार्थाच्या निर्मितीसह बॉडी बिल्डिंगमध्ये वजन किंवा फॅट कमी करण्यासाठी तसेच अधिक वेळ अलर्ट राहण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांच्यासह एलसीबी, एमआयडीसी पोलीस, फॉरेन्सिक पथक आणि पंचांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.  या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष काशिनाथ पवार, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दिव्यांगांसाठी सहाय्यक साहित्य वाटपाकरिता तपासणी शिबिर

    September 1, 2026

    ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली !

    September 1, 2026

    यावलमध्ये तीन आत्महत्यांनी खळबळ; दोघा तरुणांचा गळफास, एकाचा विहिरीत मृतदेह !

    September 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.