Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मंदिराच्या कमानीचे स्वप्न अधुरेच : ३.२४ कोटी घेतले, काम थांबवले; १.२६ कोटी परत देण्यास नकार
    क्राईम

    मंदिराच्या कमानीचे स्वप्न अधुरेच : ३.२४ कोटी घेतले, काम थांबवले; १.२६ कोटी परत देण्यास नकार

    editor deskBy editor deskAugust 31, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    मंदिराच्या कामासाठी वाढीव १ कोटी २६ लाख २५ हजार रुपये घेऊन मंदिराचे कामही पूर्ण केले नाही. तसेच घेतलेली रक्कमही देण्यास बांधकाम कंपनीच्या संचालकांनी नकार देत शहरातील स्वामिनारायण मंदिर संस्थानची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ऑगस्ट २०२२ ते मे २०२४ या दरम्यान घडली. या प्रकरणी गुजरातमधील बांधकाम कंपनीच्या संचालकांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात स्वामीनारायण मंदिराच्या बांधकामासाठी गुजरातमधील इंडर, जि. साबरकांठा येथील मांगल्य टेम्पल प्लॅडिंग अँड कन्स्ट्रक्शन या कंपनीला दगडी काम देण्यात आले. यासाठी कंपनीचे संचालक नंदीशभाई मनहरभाई सोमपुरा, किशनभाई मनहरभाई सोमपुरा, मनहरभाई प्रभाशंकर सोमपुरा यांनी सांगितल्याप्रमाणे कमानी बांधण्यासाठी दि. ८ ऑगस्ट २०२२ रोजी २३ लाख रुपये अनामत म्हणून खात्यात जमा करण्यात आले. त्यानुसार त्यांनी काम सुरू केले, मात्र काही दिवसांनी जास्तीचे पैसे लागत असल्याचे सांगून ऑगस्ट २०२२ ते दि. २७ मे २०२४ या दरम्यान वेळोवेळी एकूण ३ कोटी २४ लाख ५० हजार ५०० रुपये संस्थानकडून घेतले. मात्र त्यानंतर कमानी बांधण्याचे काम बंद केले.या प्रकरणी मंदिराचे विश्वस्त प्रमोद वासुदेव झांबरे (वय ६९, रा. महाबळ) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नंदीशभाई सोमपुरा, किशनभाई सोमपुरा, मनहरभाई सोमपुरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील करत आहेत.

    मंदिराच्या कमानीचे काम थांबविण्यात आल्यानंतर विश्वस्तांनी सदर कामाचे बिल पाहिले असता वरील तीन जणांनी १ कोटी २६ लाख २५ हजार ५०० रुपये जास्त घेतल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना काम पूर्ण करा अन्यथा पैसे परत करा, असे विश्वस्तांनी सांगितले. मात्र कंपनीच्या संचालकांनी रक्कम परत करण्यास नकार दिला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    साळशिंगी शिवारात खळबळ : झाडाला लटकलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह !

    August 31, 2026

    भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन आनंदाने निघाले… पण घरी पोहोचण्याआधीच काळाचा घाला; अपघातात दोघांचा मृत्यू!

    August 31, 2026

    चोरी करताना घरातच रंगेहाथ पकडला; पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी!

    August 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.