Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पंक्चर झालेली ओमनी रस्त्याच्या कडेला सोडली अन् चोरट्यांनी डाव साधला!
    क्राईम

    पंक्चर झालेली ओमनी रस्त्याच्या कडेला सोडली अन् चोरट्यांनी डाव साधला!

    editor deskBy editor deskAugust 30, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    कटलरीचे साहित्य विक्री करणाऱ्या वाहन पंक्चर झाल्यामुळे महामार्गाच्या कडेला उभे केले होते. चोरट्यांनी त्या वाहनासह साहित्य असा एकूण ७५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. २५ ते दि. २७ऑगस्ट दरम्यान घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील सिंधी कॉलनीत राहणारे चेतन सर्वानंद राजपाल (वय ४८) यांचा चष्मा, बेल्ट, हेडफोन, मोबाईल चार्जरसह कटलरी साहित्याची ओमनी कारमधून विक्री करुन आपला उदनिर्वाह करतात. दि. २५ रोजी दिवसभर व्यवसाय केल्यानंतर रात्री १० वाजता त्यांनी सर्व साहित्य (एमएच ०४, डीजे ५४६२) क्रमाकाच्या ओमनीत टाकुन घरी जाण्यासाठी निघाले. परंतू त्यांच्या वाहनाचे टायर पंक्चर झाल्यामुळे त्यांनी वाहन तापी पाटबंधारे कार्यालयाच्या मागील रस्त्यावर कडेला लावून घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नीची तब्येत बरी नसल्याने ते कामावर गेलेच नाही आणि गाडीचे पंक्चर देखील काढले नाही.

    गुरुवार दि. २७ रोजी चेतन राजपाल हे साहित्य विक्रीसाठी गेले असता, त्यांना ओमनी गाडीसह त्यातील साहित्य दिसून आले नाही. चोरट्यांनी वाहनासह त्यांच्या कारमधील २५ हजारांचे साहित्य असा एकूण ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. राजपाल यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    निमंत्रण मुख्यमंत्र्यांपासून आमदार-खासदारांपर्यंत; तरीही खडसेंच्या कार्यक्रमाला भाजपची दांडी!

    August 30, 2026

    सीसीटीव्हीच्या आधारे दोन चोरटे जेरबंद; अल्पवयीन मुलाचाही सहभाग उघड !

    August 30, 2026

    चामुंडा माता मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रोकड, सोन्याचे दागिने लंपास

    August 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.