Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सीसीटीव्हीच्या आधारे दोन चोरटे जेरबंद; अल्पवयीन मुलाचाही सहभाग उघड !
    क्राईम

    सीसीटीव्हीच्या आधारे दोन चोरटे जेरबंद; अल्पवयीन मुलाचाही सहभाग उघड !

    editor deskBy editor deskAugust 30, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    दुचाकी काढत असताना गर्दीचा फायदा घेत अनिल राजमल कासट (वय ६२, रा. म्हाडा कॉलनी) यांच्या खिशातून चोरट्यांनी १२ हजार ५०० रुपये लांबविले. ही घटना दि. २६ ऑगस्ट रोजी शाहूनगरमध्ये घडली होती. या प्रकरणी दि. २७ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल होऊन सईद खान नजीरखान (वय २७), समीरखान मजीद खान (वय ३५, दोन्ही रा. गेंदालाल मिल) या दोघांना अटक करण्यात आले आ हे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचाही या चोरीमध्ये सहभाग असल्याचे समोर आले असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महेश प्रगीत मंडळ येथे व्यवस्थापक म्हणून काम करणारे अनिल कासट यांचा दूध विक्रीचाही व्यवसाय आहे. दि. २६ रोजी दुधाचे पैसे जमा करण्यासाठी त्यांनी खिशात १२ हजार ५०० रुपये ठेवले होते. त्या दरम्यान शाहू नगरमध्ये एका बँकेच्या नवीन जागेतील स्थलांतर कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांना एका जणाने बोलविले. त्यासाठी ते तेथे गेले होते. तेथून परत येण्यासाठी ते दुचाकी काढत असताना एक जण दुचाकी मागे-पुढे करत होता. तर एक जण त्यांच्या जवळून गेला. कासट हे महेश प्रगती मंडळ येथे पोहचल्यानंतर खिशात पैसे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुचाकी काढत असतानाच खिशातून पैसे चोरी झाल्याची खात्री झाल्याने त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांनी तपासाच्या सूचना देत गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक सुनिल पाटील, सफौ दीपक शिरसाठ, पोहेक नंदलाल पाटील, भगवान पाटील उमेश भांडारकर, सतिष पाटील, विरेंद्र शिंदे, योगेश पाटील, अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार व भगवान मोरे यांचे पथक रवाना केले.पथकाने सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर चोरट्यांचा शोध घेत सईद खान नजीरखान व समीरखान मजीद खान या दोघांना अटक केले आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या मदतीने ही चोरी केल्याचे समोर आले असून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली देत चोरलेली बारा हजारांची रोकड काढून दिली असून पोलिसांनी ती हस्तगत केली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पंक्चर झालेली ओमनी रस्त्याच्या कडेला सोडली अन् चोरट्यांनी डाव साधला!

    August 30, 2026

    चामुंडा माता मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रोकड, सोन्याचे दागिने लंपास

    August 30, 2026

    “विकासकामांसाठी दोन शिव्या खायची तयारी ठेवा”; फडणवीसांचा अधिकाऱ्यांना कानमंत्र

    August 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.