Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोने-चांदी स्वस्त; जळगावच्या सुवर्ण बाजारात ग्राहकांना मोठा दिलासा!
    क्राईम

    रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोने-चांदी स्वस्त; जळगावच्या सुवर्ण बाजारात ग्राहकांना मोठा दिलासा!

    editor deskBy editor deskAugust 29, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    रक्षाबंधनाच्या चांदीच्य दिवशीच जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यापासून सातत्याने वाढणाऱ्या मौल्यवान धातूंच्या दराला शुक्रवारी काहीसा ब्रेक लागला. त्यामुळे सणासुदीच्या काळात खरेदीसाठी बाजारात येणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

    जळगावच्या सुवर्ण बाजारात सोमवारी दि. २४ ऑगस्ट रोजी तीन टक्के जीएसटीसह सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम १ लाख ६८ हजार ८१७ रुपये होता. गेल्या काही दिवसांत दरात सातत्याने वाढ होत होती. मात्र, शुक्रवारी दि. २८ ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात ४ हजार ५३२ रुपयांची घट होऊन भाव १ लाख ६४ हजार २८५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

    सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सोमवारी दि. २४ ऑगस्ट रोजी चांदीचा दर प्रतिकिलो २ लाख ५८ हजार ५३० रुपये होता. शुक्रवारी त्यात ४ हजार १२० रुपयांची घट होऊन चांदीचा भाव २ लाख ५४ हजार ४१० रुपये प्रतिकिलो झाला. गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. रक्षाबंधनाच्या दिवशी दरात झालेल्या घसरणीमुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरातील ही घसरण कायम राहणार की पुन्हा दरवाढीला सुरुवात होणार, याकडे ग्राहकांसह सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    एरंडोलात खळबळ ; खडकेच्या पिता-पुत्रावर नर्मदेचे संकट; मुलाला वाचवताना वडिलांचाही बळी

    August 29, 2026

    बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याचे स्टेटस ठेवत भावाने घेतला टोकाचा निर्णय !

    August 29, 2026

    सावदा पोलिसांचा गुटख्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’; १०.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त!

    August 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.