Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सरपंचानेच काढला गावठी कट्टा : डांभुर्णी चौकात हवेत गोळीबार; जळगावातून मध्यरात्री अटक
    क्राईम

    सरपंचानेच काढला गावठी कट्टा : डांभुर्णी चौकात हवेत गोळीबार; जळगावातून मध्यरात्री अटक

    editor deskBy editor deskAugust 28, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी 

    तालुक्यातील डांभुर्णी येथे भर चौकात गावठी पिस्तूलातून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या कोळन्हावी येथील विद्यमान सरपंचाला यावल पोलिसांनी अवघ्या काही तासांत जळगाव येथून ताब्यात घेत अटक केली. विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७, रा. कोळन्हावी, ता. यावल) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२७ ऑगस्ट) रात्री सुमारे आठ वाजता डांभुर्णी गावातील चौकात विकास सोळंके याने गावठी कट्ट्यातून हवेत फायर केल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद यांच्यासह पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.  पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता किनगाव रोडलगत असलेल्या शिवसम्राट सोयाबीन बिर्याणी दुकानाजवळ नुकत्याच झालेल्या फायरिंगच्या राऊंडची रिकामी पुंगळी आढळून आली. परिसरातील दुकानदारांकडे चौकशी केली असता गोळीबार विकास सोळंके याने केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. यानंतर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरील रिकामी पुंगळी तसेच अन्य भौतिक पुरावे जप्त केले.

    गोळीबार केल्यानंतर संशयित जळगावच्या दिशेने निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन व पोलीस कर्मचारी सचिन पाटील यांना जळगाव येथे रवाना करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या पथकानेही शोधमोहीम सुरू केली. संयुक्त शोधमोहीम राबवत असताना पोलिसांनी रात्री सुमारे एक वाजता जळगाव शहरातील कालंका माता मंदिर परिसरातून विकास उर्फ गोटू सोळंके याला ताब्यात घेतले. त्याला यावल पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली.

    पोलिसांच्या चौकशीत संशयिताने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, सोळंके हा कोळन्हावी ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच असून त्याच्याशी संबंधित आदर्श हॉटेल, बीअर बार व परमिट रूम असल्याचे तपासात समोर आले आहे. डांभुर्णी गावातील काही तरुण त्याच्या हॉटेलमध्ये येऊन मोबाईलवर व्हिडिओ काढत असल्याने त्यांच्याशी पूर्वीपासून वाद असल्याचे सांगण्यात आले आहे. २६ ऑगस्ट रोजी त्यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर संबंधित तरुणांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दुसऱ्याच दिवशी डांभुर्णी येथे येऊन हवेत गोळीबार केल्याची कबुली संशयिताने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

    गोळीबारासाठी वापरलेले गावठी पिस्तूल कोळन्हावी गावाच्या शिवारातील आदर्श हॉटेलजवळील स्वतःच्या शेतात लपवून ठेवल्याचे संशयिताने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत राऊंड असा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५ तसेच भारतीय हत्यार कायद्यातील कलम ३(१), २५(१-ब), ५(१), २५(१)(अ), २५(९), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहेत.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, सहायक फौजदार हेमंत सांगळे, पोलीस हवालदार रोहिल गणेश, पोलीस कॉन्स्टेबल हितेश बागुल, सचिन पाटील, अनिल साळुंखे, चालक पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हवालदार सलीम तडवी, प्रदीप चवरे आणि सचिन घुगे यांनी सहभाग घेतला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडून ४६ तोळे सोने, दीड लाखांवर डल्ला !

    August 28, 2026

    तडीपार असूनही सिद्धेश्वरनगरात वावर; पोलिसांच्या जाळ्यात निलेश काळे

    August 28, 2026

    जळगाव हादरले : वेगवेगळ्या घटनांत दोन तरुणांनी संपविले आयुष्य; कारण गुलदस्त्यात !

    August 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.