Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव पिकअपने दुचाकीला उडवले; तरुण जागीच ठार, मित्र गंभीर जखमी
    क्राईम

    भरधाव पिकअपने दुचाकीला उडवले; तरुण जागीच ठार, मित्र गंभीर जखमी

    editor deskBy editor deskAugust 27, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    दुचाकीने घरी जाणाऱ्या दुचाकीस्वार तरुणांना विरुद्ध दिशेने आलेल्या पिकअप वाहनाने धडक दिली. या अपघातात वरुण विजय सुरवाडे (रा. श्रावस्ती रेल्वे हॉस्पिटलच्या मागे, भुसावळ) हा तरुण ठार झाला तर त्याचा मित्र जखमी झाला होता. याप्रकरणी दि. २५ रोजी धडक देणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  भुसावळ येथील वरुण सुरवाडे व त्याचा मित्र पवन अडकमोल हे दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारी (एमएच १९, ईआर ८४९३) क्रमांकाच्या दुचाकीने भुसावळकडे जात होते. महामार्गावरील ऑटोनगरकडून जात असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या (एमएच २०, जीसी ९६८४) क्रमांकाच्या भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार विजय सुरवाडे हा जागीच ठार झाला तर त्याचा मित्र पवन अडकमोल हा गंभीर जखमी झाला. दरम्यान, दि. २५ रोजी सागर दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पिकअप वाहन चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ जमीन शेख हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अल्पवयीन मुलीचा पाठलाग, ; आरोपीला न्यायालयाचा दणका, ६ महिने सश्रम कारावास!

    August 27, 2026

    ट्रकच्या धडकेत २८ वर्षीय तरुण ठार, दीड वर्षाच्या चिमुकल्याने गमावला वडिलांचा आधार!

    August 27, 2026

    चिमुकल्याच्या अपघाती मृत्यूनंतर संतापाचा भडका; वाहन पेटवले, पोलिसांच्या कामात अडथळा १० जणांवर गुन्हा

    August 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.