Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सीसीटीव्हीच्या मदतीने दुचाकी चोरटा गजाआड; शनिपेठ पोलिसांची दमदार कारवाई
    क्राईम

    सीसीटीव्हीच्या मदतीने दुचाकी चोरटा गजाआड; शनिपेठ पोलिसांची दमदार कारवाई

    editor deskBy editor deskAugust 24, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील बालाजी पेठेतून दुचाकी चोरणाऱ्या शेख ईरफान शेख रईस (रा. एरंडोल) या चोरट्याच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरुन शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडन चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

    मिळलेल्या माहितीनुसार, शहरातील बालाजी पेठेतून निलेश प्रकाश बोरसे (वय २७) यांची दि. १३ ऑगस्ट रोजी चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली होती. बाहेरगावाहून परतल्यानंतर ही घटना दि. १८ ऑगस्ट रोजी उघडकीस आल्यानंतर शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकाला हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक संतोष खेडकर, परि. उपनिरीक्षक अभिषेक कटारे, पोहेकॉ विजय खैरे, योगेश जाधव, पराग दुसाने, अमोल वंजारी, निलेश घुगे गणेश ढाकणे, योगेश साबळे यांचे पथक रवाना केले होते.

    गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक संतोष खेडकर यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर चोरट्याचा शोध सुरु केला. संशयित चोरटा हा एरंडोल येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने बस स्टॅण्ड परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केलयानंतर त्याने चोरलेल्या तीन दुचाकी काढून दिल्या असून पोलिसांनी त्या जप्त केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तीन मित्र फिरायला गेले, एकाचा मृत्यूने प्रवास संपला; पाटचारीत बुडून हाशिमचा दुर्दैवी अंत

    August 24, 2026

    विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांचा ‘स्ट्राईक’; दोन पिकअप जप्त

    August 24, 2026

    थकीत भाडे भरा, नाहीतर गाळे सील! गोलाणी मार्केटमध्ये आयुक्तांचा कडक इशारा

    August 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.