Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » थकीत भाडे भरा, नाहीतर गाळे सील! गोलाणी मार्केटमध्ये आयुक्तांचा कडक इशारा
    जळगाव

    थकीत भाडे भरा, नाहीतर गाळे सील! गोलाणी मार्केटमध्ये आयुक्तांचा कडक इशारा

    editor deskBy editor deskAugust 23, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात आज सकाळी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली, यावेळी जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री.आदित्य जीवने (भा.प्र.से.) यांनी संपूर्ण गोलाणी मार्केट परिसराची पाहणी करून स्वच्छता, अतिक्रमण तसेच गाळेधारकांच्या विविध समस्यांचा आढावा घेतला.

    पाहणीदरम्यान मार्केट परिसरात वाढीव अतिक्रमण, दुकानांसमोरील ओटे, अनधिकृत बोर्ड व फ्लेक्स यामुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली. मार्केट परिसरातील वाढीव अतिक्रमण, ओटे, बोर्ड व फ्लेक्स यांच्यावर तात्काळ कारवाई करून संबंधितांकडून दंड आकारण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

    थकीत वसुली तातडीने भरण्याचे निर्देश
    गोलाणी मार्केटमधील ज्या गाळेधारकांकडे महानगरपालिकेची वसुली अथवा भाडे थकीत आहे, त्यांनी लवकरात लवकर थकीत रकमेचा भरणा करावा, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. थकीत रकमेचा भरणा न करणाऱ्या गाळेधारकांवर नियमानुसार गाळे सील करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

    केबल वायर व अनावश्यक साहित्य हटविण्याच्या सूचना
    मार्केट परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या केबल वायर तसेच अवास्तव व अनावश्यक सामानामुळे नागरिकांना व ग्राहकांना होणारा त्रास लक्षात घेता, हे साहित्य तातडीने हटवून परिसर मोकळा करण्याच्या सक्त सूचना आयुक्तांनी दिल्या. मार्केटमधील सार्वजनिक जागा अडथळेमुक्त ठेवण्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

    दुकानासमोर कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
    गोलाणी मार्केट परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक गाळेधारकाने आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दुकानासमोर किंवा परिसरात कचरा टाकणाऱ्या गाळेधारकांवर घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. स्वच्छता केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून व्यापारी व नागरिकांनीही त्यामध्ये सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

    गोलाणी मार्केट परिसरातील स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, थकीत वसुली आणि सार्वजनिक जागा मोकळ्या करण्याच्या कामाला प्राधान्य देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त श्री. आदित्य जिवने (भा. प्र. से.)यांनी दिले. त्यामुळे आगामी काळात गोलाणी मार्केट परिसर अधिक स्वच्छ, सुव्यवस्थित आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेची कारवाई अधिक तीव्र होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कन्नड घाटात एसटी बसचा थरार! स्टेअरिंग रॉड तुटला; ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला

    August 23, 2026

    २३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून संपविले आयुष्य !

    August 23, 2026

    २० फूट उंचीवरून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू!

    August 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.