नशिबाची सोडत अन् गिफ्टचा जल्लोष! सेवा सुपर मार्टमध्ये 80+ ग्राहक ठरले विजेते
पिंप्री | प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील सेवा सुपर मार्टमध्ये ग्राहकांसाठी आयोजित करण्यात आलेला लकी ड्रॉ उत्साहात पार पडला. संसारोपयोगी वस्तू आणि संपूर्ण किराणा साहित्य एकाच छताखाली वाजवी दरात उपलब्ध करून देणाऱ्या सेवा सुपर मार्टच्या या उपक्रमाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ग्राहकांना खरेदीसोबत लकी ड्रॉचे कूपन देण्यात आले होते. उपस्थित नागरिकांसमोर लहान मुलांच्या हस्ते लकी ड्रॉची सोडत काढण्यात आली. कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता पारदर्शक पद्धतीने विजेत्यांची निवड करण्यात आली.
🎉 लकी ड्रॉमध्ये तब्बल ८० हून अधिक ग्राहक विजेते ठरले!
विजेत्यांना विविध आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. बक्षिसे मिळाल्यानंतर ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. यावेळी ग्राहकांनी सेवा सुपर मार्टच्या संचालकांचे आभार मानत मिळणारी दर्जेदार सेवा, वाजवी दर आणि ग्राहकांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले.
सेवा सुपर मार्टमध्ये पिंप्रीसह परिसरातील अनेक गावांमधून नागरिक किराणा व संसारोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी येतात. ‘किराणा खरेदी, कूपन मिळवा आणि जिंका आकर्षक बक्षिसे’ या उपक्रमामुळे ग्राहकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली होती.
दरम्यान, लकी ड्रॉमध्ये नाव आले असून जे विजेते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी आपली भेटवस्तू सेवा सुपर मार्टमधून घेऊन जावी. अशा विजेत्यांशी वैयक्तिक संपर्कही करण्यात येणार असल्याचे सेवा सुपर मार्टकडून सांगण्यात आले.
ग्राहकांचा विश्वास, प्रेम आणि समाधान हेच आमच्यासाठी सर्वात मोठे बक्षीस आहे, असे सांगत सेवा सुपर मार्टच्या संचालकांनी सर्व ग्राहकांचे मनःपूर्वक आभार मानले.



