Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, कार आणि दोन मोबाईल जप्त
    क्राईम

    स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, कार आणि दोन मोबाईल जप्त

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 20, 2026Updated:July 21, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगरकडे गुटख्याची वाहतूक उधळली; बुलढाणा जिल्ह्यातील दोन आरोपी ताब्यात

    जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, एक चारचाकी वाहन आणि दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासासाठी त्यांना मुक्ताईनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

    पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. एमएच-३० एझेड-४६६४ क्रमांकाच्या मारुती सुझुकी अर्टिगा वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक मुक्ताईनगरकडे होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.

    वाहनाची तपासणी केली असता विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    जप्त मुद्देमाल

    प्रतिबंधित गुटखा – ₹३,८६,९०८

    मारुती सुझुकी अर्टिगा कार – ₹८,००,०००

    विवो कंपनीचे दोन मोबाईल – ₹२०,०००


    एकूण जप्त मुद्देमाल – ₹१२,०६,९०८

    या कारवाईत सय्यद आरिफ सय्यद हकीम (नदीम, वय ३५, रा. पिंपळगाव राजा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि खलील उल्ला खान (वय ३२, रा. शेगाव रोड, खामगाव, जि. बुलढाणा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस स्टेशन करत आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस नाईक हेमंत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रतन गिते व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

    पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगत, प्रतिबंधित पदार्थमुक्त समाज घडविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगावच्या निर्णयविरोधात
    किशोर आप्पांचा एल्गार!

    July 17, 2026

    जाणता राजा नगरात भव्य शिव मंदिराचे भूमिपूजन; आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते सोहळा संपन्न

    July 17, 2026

    पीडब्ल्यूडी चे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या अडचणीत वाढ

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.