Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगावच्या निर्णयविरोधातकिशोर आप्पांचा एल्गार!
    चाळीसगाव

    चाळीसगावच्या निर्णयविरोधात
    किशोर आप्पांचा एल्गार!

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 17, 2026Updated:July 17, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा-भडगाव मतदारसंघ चाळीसगावला जोडण्याच्या हालचालींवर आमदार किशोर पाटील यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची चेतावणी

    पाचोरा : पाचोरा-भडगाव मतदारसंघाला प्रस्तावित चाळीसगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्याच्या हालचालींना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शुक्रवारी दुपारी ‘शिवालय’ शिवतीर्थ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की, “हा निर्णय कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही.

    “आमदार पाटील यांनी सांगितले की, चाळीसगाव शहराला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय देण्यास त्यांचा विरोध नाही. मात्र पाचोरा-भडगाव मतदारसंघ त्याला जोडणे म्हणजे येथील नागरिकांवर अन्याय करणारा निर्णय ठरेल. जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, सत्र न्यायालय, कृषी व समाजकल्याण विभाग अशी महत्त्वाची कार्यालये असल्याने नागरिकांची कामे एका ठिकाणी पूर्ण होतात. चाळीसगावला जोडल्यास शेतकरी, व्यापारी व वकील यांना अनावश्यक प्रवास, आर्थिक भार व मनस्ताप सहन करावा लागेल, असे त्यांनी नमूद केले.

    यापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व विभागीय आयुक्त यांना लेखी निवेदन देऊन हा प्रस्ताव मागे घेण्यात आला होता. मात्र पुन्हा हालचाली सुरू झाल्याने मतदारसंघात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार, महसूल मंत्री तसेच जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सामूहिक निवेदन देण्यात येणार असून, त्यासाठी हजारो नागरिकांच्या सह्या गोळा करण्याची मोहीम सुरू होणार आहे.आमदार पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला की, आवश्यकता भासल्यास जनआंदोलन, रस्ता रोको, जेलभरो आंदोलन उभारले जाईल.

    “निर्णय झाला तर माझी आमदारकी पणाला लागली तरी चालेल; मात्र मतदारसंघावर अन्याय होऊ देणार नाही,” असे ठाम विधान त्यांनी केले. त्यांनी शिवसैनिकांच्या ताकदीवर अन्यायाविरोधात लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.हा लढा केवळ राजकीय नसून नागरिकांच्या हक्कांचा असल्याचे सांगत त्यांनी सर्व पक्ष, वकील संघटना, सामाजिक संस्था व नागरिकांना एकजुटीने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

    पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या घडामोडींचा पुढील टप्पा जनआंदोलन, नागरिकांचा प्रतिसाद, किंवा शासकीय निर्णय प्रक्रिया यावर केंद्रित होऊ शकतो.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जाणता राजा नगरात भव्य शिव मंदिराचे भूमिपूजन; आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते सोहळा संपन्न

    July 17, 2026

    पीडब्ल्यूडी चे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या अडचणीत वाढ

    July 17, 2026

    आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; जळगावातील प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.