विजय पाटील जळगाव: सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांचा पदोन्नतीचा मार्ग वाढत्या तक्रारीमुळे बंद झाला असून राजकीय वजनही अपूर्ण पडत आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिष्ठा लावून देखील प्रशांत सोनवणे यांची पदोन्नती रखडलेली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेक नेत्यांनी प्रशांत सोनवणे यांच्या विरोधात रान उठवल्यामुळे त्यांच्या पदोन्नतीच्या मार्गात काटे निर्माण झाले आहे. तसेच त्यांच्या अधीक्षक पदाच्या खुर्चीवर प्रभारी म्हणून अमळनेर विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी राऊत यांनी राजकीय नेत्यांकडे फिल्डिंग लावले असून प्रशांत सोनवणे यांच्या खुर्चीला त्यांनी सुरुंग लावल्याचे बोलले जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी देखील प्रशांत सोनवणे यांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सार्वजनिक बांधकाम विभाग यामुळे चांगला चर्चेला आलेला आहे वाढत्या तक्रारीमुळे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा होतो की काय हे आगामी काळात लवकरच कळेल परंतु आज मात्र टेन्शन आहे.



