सुभाष राऊत यांनी प्रशांत सोनवणे यांची केली नेत्याकडे काडी…!
विजय पाटील जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच चर्चेत असतो राजकीय सह प्रशासकीय अडचणीत असलेले जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे हे जरी स्वतःला मातब्बर समजत असले तरी त्यांना शह देण्याचे काम अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांनी केले आहे.
राऊत यांची नजर प्रशांत सोनवणे यांच्या खुर्चीवर असल्याने शह काटशहाचे राजकारण सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सुरू आहे. सुभाष राऊत यांनी प्रशांत सोनवणे यांच्या खुर्चीला सुरुंग लावला असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत काही पुरावे हाती लागले असून कॉल रेकॉर्डिंग देखील समोर आली आहे. प्रशांत सोनवणे यांना सार्वजनिक बांधकाम विभागातूनच जूनियर मंडळी हाकलण्याचा प्रयत्न आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग राजकीय अड्डा बनू पाहत आहे. सुभाष राऊत यांनी प्रशांत सोनवणे यांची जिल्ह्यातील मातब्बर नेत्याकडे मोठी काडी केल्यामुळे अडचणीचा डोंगर प्रशांत सोनवणे यांच्यासमोर उभा राहिलेला आहे.



