Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अपघात नव्हे, आई-मुलाला विहिरीत ढकलले! साडेतीन वर्षीय अंध चिमुकल्याचा मृत्यू; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा
    क्राईम

    अपघात नव्हे, आई-मुलाला विहिरीत ढकलले! साडेतीन वर्षीय अंध चिमुकल्याचा मृत्यू; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा

    editor deskBy editor deskJuly 14, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    यावल तालुक्यातील किनगाव येथे मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या प्रकरणाने पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर खुनाचे गंभीर स्वरूप धारण केले. साडेतीन वर्षांच्या अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार मारल्याचा, तसेच त्याच्या आईलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पती आणि सासूवर करण्यात आला असून, याप्रकरणी यावल पोलिसांनी खुनासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास किनगाव शिवारातील शेतातील विहिरीत सरस्वती स्वप्निल पाटील (वय २७) या ७० टक्के दृष्टिहीन महिलेसह तिचा साडेतीन वर्षीय मुलगा कृष्णा पडल्याची घटना घडली होती. या घटनेत सरस्वती या गंभीर जखमी झाल्या, तर कृष्णाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती.

    जखमी सरस्वती यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रारंभी त्यांनी ही घटना अपघाती असल्याचे सांगितल्याने पोलिसांनाही तसा संशय नव्हता. मात्र, घटनेतील काही बाबी संशयास्पद वाटल्याने आणि मुलाचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्यांची सखोल चौकशी केली. त्यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेबाबत धक्कादायक माहिती दिली.

    सासूने दिला धक्का, पतीचाही सहभाग असल्याचा आरोप

    सरस्वती पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घटना घडली त्या दिवशी त्या, त्यांचे पती स्वप्निल भागवत पाटील (वय ३४) आणि सासू आशाबाई भागवत पाटील हे शेतातील विहिरीची पूजा करण्यासाठी गेले होते. याचवेळी सासूने त्यांना आणि त्यांच्या मुलाला विहिरीत ढकलून दिले. या कृत्यात पतीचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

    विहिरीत पडल्यावर सरस्वती यांनी विहिरीतील लाकडी फाउंडेशनचा आधार घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा कृष्णा पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    गर्भपातावरून सुरू होता वाद

    पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सरस्वती या ७० टक्के दृष्टिहीन असून त्यांचे पती स्वप्निल हे शंभर टक्के दृष्टिहीन आहेत. जन्मलेला मुलगा कृष्णाही दृष्टिहीन होता. डॉक्टरांनी गर्भावस्थेदरम्यान बाळही दृष्टिहीन असण्याची शक्यता सांगितल्यानंतर पतीने गर्भपात करण्याचा आग्रह धरला होता. मात्र, सरस्वती यांनी गर्भपातास नकार देत मुलाला जन्म दिला. त्यानंतर या कारणावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते. या वादामुळे सरस्वती या जवळपास अडीच वर्षे माहेरी राहत होत्या, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

    दोन्ही आरोपी ताब्यात

    या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १०९(१) आणि ३(५) अंतर्गत खुनाचा आणि खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती स्वप्निल पाटील आणि सासू आशाबाई पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

    ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण यावल तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणामागील धक्कादायक सत्य समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव रेल्वेच्या धडकेत एकाचा दुर्देवी मृत्यू !

    July 14, 2026

    जी.एस. ग्राऊंड परिसरात कारवाई; दोघे अटकेत, कांचननगरातील घराचीही झाडाझडती

    July 14, 2026

    ऐन हळदीच्या कार्यक्रमात शनिपेठ पोलिसांची धडक; दोन बालविवाह उधळले

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.