Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावच्या विकासाला ९०० कोटींची गती; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
    जळगाव

    जळगावच्या विकासाला ९०० कोटींची गती; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 7, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चार वर्षे सलग १००% निधी खर्चाची परंपरा कायम; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दर्जेदार नियोजन व वेळेत कामे पूर्ण करण्याचे दिले निर्देश

    विजय पाटील : जळगाव
    जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार नियोजन आणि विकासकामांची वेळेत अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुंबईहून दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला संबोधित करताना, जळगाव जिल्ह्याने सलग चार वर्षे जिल्हा वार्षिक योजनेचा १०० टक्के निधी खर्च करून राज्यात आदर्श निर्माण केल्याचे सांगितले.

    बैठकीत सन २०२५-२६ मधील ₹८३४.६२ कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता देण्यात आली. तसेच सन २०२६-२७ साठी ₹९००.०५ कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

    बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

    जिल्ह्यातील २९ शहीद जवान स्मारकांचे ऑनलाइन भूमिपूजन.

    सप्टेंबर २०२६ पर्यंत सर्व विकासकामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी खर्चाला गती देण्याचे निर्देश.

    महावितरणच्या प्रलंबित व पूर्ण झालेल्या कामांचा छायाचित्रांसह अहवाल सादर करण्याचे आदेश.

    ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शवविच्छेदन गृहांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर.

    नागरी अंगणवाडी इमारती, डोंगरी विकास कार्यक्रम, पर्यटन स्थळे आणि ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांना मंजुरी.

    रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात Banana Export Centre उभारण्याच्या प्रस्तावाला मान्यता.

    केळी कटींग व पॅकेजिंग व्हॅन उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय.

    अहिराणी भाषेचा AI प्रणालीमध्ये समावेश करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा.


    यावेळी MahaSTRIDE PMU च्या प्राथमिक मूल्यांकनानुसार जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती देण्यात आली. अंतिम मूल्यांकनानंतर जिल्ह्याला सुमारे ₹१६ कोटींचे प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

    बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    हतनूर धरणाचे २२ दरवाजे १ मीटरने उघडले; तापी नदीकाठच्या गावांना हायअलर्ट

    July 4, 2026

    कामाच्या ठिकाणी काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने १९ वर्षीय मुस्तकीमचा मृत्यू

    July 4, 2026

    मोहाडी रोड ते शिरसोली रोड अखेर नव्याने होणार; नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

    July 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.