Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पभूधारक वृद्ध शेतकाऱ्याने संपविले आयुष्य !
    क्राईम

    अल्पभूधारक वृद्ध शेतकाऱ्याने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskJune 11, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवडः प्रतिनिधी 

    तालुक्यातील मनुर बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी रमेश पंढरी बाठे (वय ६०) यांचे उपचार सुरू असतांना जिल्हा रुग्णालयात निधन झाले. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे ते सतत मानसिक तणावात रहात असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

    मिळालेल्या माहितीनुसार,  मनुर खुर्द शिवारातील शेतामध्ये रविवार ७ जून २०२६ रोजी सकाळी कपाशी लागवड करण्यास गेले होते. मात्र, दुपारपर्यंत शेतातून घरी न आल्यामुळे मुलगा त्यांना शेतामध्ये बघण्यासाठी गेला असता अर्धवट बेशुद्ध अवस्थेमध्ये कडूनिंबाच्या झाडाखाली आढळून आले. मुलाने त्यांना काय झाल असे विचारले असता त्यांनी विषारी औषधे घेतल्याचे सांगितले त्यानंतर त्यांना खाजगी वाहनाने बोदवड ग्रामीण रुग्णालयमध्ये नेण्यात आले. त्यांच्या प्राथमिक उपचार करून सरकारी रुग्णवाहिकेने त्यांना जिल्हा रुग्णालयमध्ये संध्याकाळी सहा वाजता दाखल करण्यात आले.

    त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना दि. १० रोजी सकाळी ७ वा त्यांची प्राणज्योत मानवली. सततची नापिकी त्यामुळे विकास सोसायटीचे, बचत गटाचे कर्ज, कृषी केंद्र यांची भरपाई करण्यासाठी नातलगांकडून घेतलेल्या पैशाची खाजगी उधारी याची परतफेड होत नसल्याने ते सतत मानसिक तणावात रहात होते, असे कुटुंबीयांनी सांगितले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद जळगाव येथे जिल्हा पेठपोलीस ठाण्यात दाखल झालेली असून, शून्य क्रमांकाने बोदवड पोलीस ठाण्यात पाठवण्यात येणार आहे.

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महामार्गावरील अपघाताने हळहळ; दुचाकीस्वार ठार, मुलीसह दोघांवर धुळ्यात उपचार सुरू

    June 11, 2026

    भरधाव डंपरखाली चिरडून आजोबांचा मृत्यू !

    June 11, 2026

    ताडपत्री विक्रीच्या व्यवसायासाठी आलेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू !

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.